आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी जमलेल्या बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांना निवडणूक आयोगाच्या वतीने रोखण्यात आले, असा दावा विहिंपच्या सदस्यांनी केला आहे. राज्यात लागू असलेल्या कलम 144 लागू असल्याने निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना हनुमान चालिसा पठण करण्यापासून रोखले.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आपल्या समर्थकांसह हुबळीतील विजयनगरमध्ये पोहोचले आणि हनुमान चालिसाचे पठण केले. प्रत्यक्षात, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने सोमवारी जाहीर केले होते की, मंगळवारी देशभरातील प्रमुख मंदिरांमध्ये हनुमान चालिसाचे पठण केले जाईल. संघटनांनी त्याला 'हनुमंत शक्ती जागरण अभियान' असे नाव दिले आहे.
कर्नाटक निवडणूकीत मुद्दा आला समोर
खरे तर कर्नाटक निवडणुकीत बजरंग बली आणि बजरंग दल हे विषय समोर आले. त्याचे झाले असे की, काँग्रेसने गेल्या आठवड्यात जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात म्हटले आहे की, 'राज्यात सरकार येताच ते बजरंग दल, पीएफआयवर बंदी घातली जाईल. जात आणि धर्माच्या आधारावर समुदायांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या सर्व संघटनांवर कडक कारवाई केली जाईल.
विश्व हिंदू परिषद म्हणाले – बंदीची घोषणा अपमानास्पद
विहिंपचे सरचिटणीस मिलिंद परांडे म्हणाले, "काँग्रेसने कर्नाटकात बजरंग दलावर बंदी घालण्याचे बोलले आहे. यानंतर राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील काँग्रेस आणि इतर काही हिंदुद्वेषी नेत्यांनी बजरंग दलावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हे अत्यंत अपमानास्पद आहे. त्यामुळेच बजरंग दलाने काँग्रेस आणि इतर संघटनांना सुबुद्धी मिळावी, म्हणून हनुमानांच्या मंदिरासमोर चालिसा पठण कार्यक्रम केला जाणार आहे.
काय म्हटले होते कॉंग्रेस निवडणूक जाहीरनाम्यात
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 2 मे रोजी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की, 'कायदा आणि संविधान पवित्र आहेत, असे आमचे मत आहे. कोणतीही व्यक्ती किंवा बजरंग दल, पीएफआय आणि इतर संघटना जे द्वेष, शत्रुत्व पसरवतात, मग ते बहुसंख्य असोत किंवा अल्पसंख्याक असोत, ते कायदा आणि संविधानाचे उल्लंघन करू शकत नाहीत. अशा संघटनांवर कायद्यानुसार बंदी घालण्यासह निर्णायक कारवाई करू.
भाजपने प्रत्येक सभेत हा मुद्दा बनवल्यावर काँग्रेस बॅकफूटवर आली. ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी गेल्या रविवारी सांगितले की, 'पक्षाच्या जाहीरनाम्यात असे अजिबात म्हटलेले नाही की बजरंग दल राज्यात सरकार बनवताच त्यावर बंदी घालण्यात येईल. द्वेष पसरवणाऱ्या सर्व संघटनांवर कायद्याच्या कक्षेत राहून निर्णायक कारवाई करण्याचे आश्वासन पक्षाने निश्चितपणे दिले आहे.
हे ही वाचा
कर्नाटकात कॉंग्रेसचा जाहीरनामा:बजरंग दल, PFI वर बंदी घालू; दरमहा 200 युनिट फ्री वीज, महिलांना 2 तर बेरोजगारांना 3 हजार देणार
भारतीय जनता पक्षाच्या पाठोपाठ आता काँग्रेसनेही कर्नाटक विधानसभेसाठी आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. काँग्रेस पक्षाने सरकार आल्यास बजरंग दल आणि पीएफआयवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले. याशिवाय कुटुंबातील प्रत्येक महिला प्रमुखाला दरमहा दोन हजार रुपये देण्याची घोषणा केली. महिलांना राज्य सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करण्याचे आश्वासनही दिले आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.