आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Assembly Elections| PM MODI Video Message| BJP Vs Congress |Karnataka Election

निवडणूक:कर्नाटकला गुंतवणूक, इनोव्हेशन, उद्योगात क्रमांक एकचे राज्य बनवण्याची इच्छा; PM मोदींचे कानडी मतदारांना आवाहन

बंगलोर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकमध्ये बुधवारी म्हणजेच 10 मे रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. यासाठीचा प्रचार संपला आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या मतदारांना एका व्हिडिओ संदेशाद्वारे कर्नाटकच्या जनतेला भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. गुंतवणूक, इनोव्हेशन व उद्योगांत कर्नाटकला क्रमांक 1 चे राज्य बनवण्यासाठी भाजपला मतदान करा, असे ते म्हणालेत.

वाचा पंतप्रधान मोदींचा संदेश...

'तुम्ही मला दिलेले प्रेम देवाच्या आशीर्वादासारखे आहेत. कर्नाटकातील जनतेची हाक अजूनही माझ्या कानात गुंजत आहे. स्वातंत्र्याच्या पहाटे आपण भारतीयांनी आपल्या देशाला विकसित भारत बनवण्याची प्रतिज्ञा घेतली होती. त्यानुसार विकसित भारताचे नेतृत्व करण्याची क्षमता कर्नाटकात आहे. आपण जगातील 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत. आपल्याला त्याला टॉप-3 मध्ये न्यायचे आहे. कर्नाटकच्या अर्थव्यवस्थेची वेगाने प्रगती झाली तरच हे शक्य होईल.

कर्नाटकातील डबल इंजिन सरकारचा साडे 3 वर्षांचा कार्यकाळ तुम्ही नुकताच पाहिला. कर्नाटकच्या अर्थव्यवस्थेच्या विस्तारात भाजप सरकारची निर्णायक, केंद्रित व भविष्याभिमुख धोरणे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

कोरोनासारख्या जागतिक महामारीनंतरही कर्नाटकातील भाजप सरकारच्या कार्यकाळात वार्षिक 90 हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली. मागील सरकारच्या काळात हा आकडा केवळ 30 हजार कोटी रुपये एवढाच होता. विकासाप्रती, कर्नाटकाप्रती व विशेषत: तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपची ही बांधिलकी आहे. गुंतवणूक, उद्योग व नवोन्मेषात कर्नाटकला नंबर-1 बनवायचे आहे. शिक्षण, रोजगार व उद्योजकता यामध्ये भाजपला नंबर 1 बनवायचे आहे.

कर्नाटक निवडणुकीशी संबंधित इतर बातम्या वाचा...

कर्नाटक निवडणूक 2023:स्थानिक मुद्द्यांमुळे काँग्रेसचे पारडे जड, भाजपचा जोर मोदी फॅक्टरवर; 10 मे राेजी मतदान

कर्नाटकमध्ये ८ मे रोजी प्रचार थंडावेल. १० मे रोजी मतदान होईल तर १३ मे रोजी निकाल जाहीर होईल. संपूर्ण प्रचार मोहिमेत भाजपवर ४० टक्के कमिशनखोरीचा आरोप लावण्यात काँग्रेसची सिद्धरामय्या-डीके शिवकुमार ही जोड यशस्वी ठरली. स्थानिक मुद्द्यांवरून काँग्रेसने भाजपला घेरल्याचेही दिसून आले. दुसरीकडे तिकीट वाटपानंतर बंडखोरी, नेतृत्वावरून संभ्रम, जुन्या नेत्यांनी दिलेली सोडचिठ्ठी, डगमगलेला लिंगायत पाठिंबा यात भाजपला आता हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाकडून अपेक्षा आहेत. त्यामुळेच बजरंगबलीचा मुद्दा उचलण्यात आला. येथे वाचा संपूर्ण बातमी...

खळबळजनक:मल्लिकार्जुन खरगेंची कुटुंबीयांसह हत्या करण्याचा भाजप नेत्याचा कट, काँग्रेस नेते रणदीपसिंह सुरजेवाला यांचा आरोप

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध तीव्र झाले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेसच्या नेत्यांमधील वादाला आता वैयक्तिक हल्ल्याचे स्वरूप आले आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा भाजप नेत्याने कट रचल्याचा आरोप काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केला आहे.

रणदीप सिंह सुरजेवाला यांनी शनिवारी बंगळुरूमध्ये सांगितले की, भाजप नेते हे मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब ठार करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी आरोप केला की, पीएम मोदींच्या आवडत्या चित्तापूरच्या एका नेत्याने मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येबाबत वक्तव्य केले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या हत्येचा कट रचण्याच्या पातळीपर्यंत भाजप आता झुकली आहे, असा आरोप सुरजेवाला यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी...