आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्झिट पोल:कर्नाटकात काँग्रेस बहुमताच्या जवळ; 72,63% मतदान, सर्व विक्रम मोडले, निकाल शनिवारी

दिव्य मराठी नेटवर्क | बंगळुरू18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेडीएस ठरू शकतो किंगमेकर, २२ जागा मिळण्याचा अंदाज

कर्नाटकात बुधवारी २२४ जागांसाठी मतदान झाले. मतदान संपताच एक्झिट पोल आले. त्यानुसार कर्नाटकात १९८९ पासून दर ५ वर्षांत सरकार बदलण्याची परंपरा कायम राहील. सर्व एक्झिट पोलची सरासरी काढल्यास काँग्रेस ११० जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. भाजपला ८९ जागा मिळण्याची शक्यता आहे. अशा वेळी तिसरा सर्वात मोठा पक्ष जेडीएस किंगमेकर ठरणार आहे. तथापि, कर्नाटकात ७२.६३% मतदानासह सर्व विक्रम मोडले. २०१८ मध्ये ७२.३६% मतदान झाले होते. बीबीएमपी नॉर्थ जिल्ह्यात सर्वात कमी ५६% व बंगळुरू ग्रामीणमध्ये सर्वाधिक ८४% मतदान झाले.

कर्नाटक - २२४ | बहुमत - ११३ जागा

या कर्नाटक निवडणुकीचे 3 ओपिनियन पोल...

1. India TV-CNX: स्पष्ट बहुमत नाहीपोलनुसार, काँग्रेस 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष बनू शकतो. भाजप 85 आणि जेडीएस 32 जागा जिंकू शकतो. म्हणजे कोणालाच बहुमत नाही. 6 मे रोजी सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये 112 जागांसाठी 11 हजार 200 जणांचे मत विचारात घेतले.

2. एबीपी न्यूज-सी व्होटर : काँग्रेस सरकारसर्वेक्षणात काँग्रेसला 110 ते 122, भाजपला 73 ते 85 आणि जेडीएसला 21 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे काँग्रेसचे सरकार. सर्वेक्षणात 73 हजार लोकांचा अभिप्राय घेण्यात आला आहे. 44% लोकांनी कॉंग्रेसला मतदान केले, तर 32% लोकांनी भाजपचे सरकार स्थापनेचे भाकीत केले. 31% लोकांनी बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या असल्याचे सांगितले.

3. झी न्यूज-मॅट्रिक्स: भाजप सरकारसर्वेक्षणात भाजपला 103 ते 118, काँग्रेसला 82 ते 97 आणि जेडीएसला 28 ते 33 जागा मिळण्याची शक्यता आहे. सँपल साइजच्या दृष्टीने हे सर्वात मोठे मत सर्वेक्षण आहे. यामध्ये 224 जागांवर 3 लाख 36 हजार लोकांचा अभिप्राय घेण्यात आला. प्रत्येक विधानसभेच्या जागेवर 1500 लोकांशी बोलणे झाले.

ही सर्व आकडेवारी सर्वेक्षणात सहभागी असलेल्या एजन्सीजची आहे.