आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकातील हिजाबचा वाद अद्याप शांत झालेला नाही तोच एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात लावलेले पोस्टर्स चर्चेत आहेत. वृत्तसंस्थेनुसार, कर्नाटकातील अनेक मंदिरांमध्ये वादग्रस्त बॅनर लावण्यात आले असून, त्यात मुस्लिम संघटनांना मंदिरांजवळ होणाऱ्या जत्रेत दुकाने किंवा स्टॉल लावू नयेत, असे लिहिले आहे.
मात्र, मंदिरांचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या समित्यांनी असा कोणताही आदेश दिल्याचे नाकारला आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अब्दुल अझीम यांनी बुधवारी सांगितले की, बिगर हिंदूंना दुकाने लावू न देण्याबाबत मंदिर प्रशासनाशी चर्चा सुरू असून लवकरच हे प्रकरण निकाली काढले जाईल.
बॅनरच्या मागे कट्टरतावादी गट
मंदिर समितीने नकार दिल्यानंतर हे बॅनर लावणाऱ्यांचा शोध लागू शकलेला नाही. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार यामागे कट्टर हिंदू गटांचे सदस्य असू शकतात. हिजाब वादावर न्यायालयाच्या निर्णयानंतर मुस्लिम संघटनांनी आपली दुकाने बंद करण्याची घोषणा केली, असे उजव्या विचारसरणीच्या गटांचे मत आहे. त्यामुळे मंदिरांच्या वार्षिक जत्रांमध्ये त्यांना स्टॉल लावू देऊ नयेत.
दुर्गापरमेश्वरी मंदिरात 20 एप्रिलपासून जत्रा
कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्याजवळील बाप्पानाडू दुर्गापरमेश्वरी मंदिरात 20 एप्रिल रोजी वार्षिक जत्रा आयोजित केली जाणार आहे. जत्रेत स्टॉल लावण्यासाठी मंदिराच्या जमिनीचा लिलाव करण्यात येणार आहे. मुस्लिम संघटनांना यात सहभागी होण्यास मनाईचे मंदिराच्या चहुबाजूंनी बॅनर लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये केवळ हिंदूंनाच दुकाने आणि स्टॉल लावण्याची परवानगी द्यावी, असे म्हटले आहे.
बाप्पानाडू दुर्गापरमेश्वरी मंदिराव्यतिरिक्त पुत्तूर तालुक्यातील महालिंगेश्वर मंदिरातही जत्रा भरवण्यात येणार आहे. येथेही अशाच प्रकारचे बॅनर दिसून आले आहे, ज्यावर लिहिले आहे की, 'कायद्याचा आदर न करणारे आणि जे एकजुटीच्या विरोधात आहेत, जे अशा गायींना मारतात ज्यांची आम्ही पूजा करतो, त्यांना दुकान थाटण्याची परवानगी दिली जाणार नाही."
पुत्तूर येथील मंगलादेवी मंदिर, पोलाली राजराजेश्वरी मंदिरासह अन्य मंदिरांमध्येही असेच बॅनर दिसून आले आहेत.
मंदिर प्रशासनाने सांगितले - व्यवसायावर बंदी नाही
या प्रकरण चर्चेत आल्याचे पाहून मंदिर प्रशासनाने खुलासा सादर केला. दुर्गापरमेश्वरी मंदिराचे प्रशासक मनोहर सेठी म्हणाले की, मंदिर प्रशासनाने असे बॅनर लावलेले नाहीत. काही लोकांनी आमच्या परवानगीशिवाय येथे बॅनर लावले आहेत. जत्रेत दुकाने, स्टॉल लावण्यापासून कोणालाही रोखण्यात आलेले नाही.
दुसरीकडे, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अब्दुल अझीम म्हणाले की, मंदिर प्रशासनाशी बोलून हे प्रकरण लवकरच सोडवले जाईल. ते म्हणाले, 'हा भावनेने घेतलेला निर्णय आहे. येथे विविध धर्मांचे लोक वेगवेगळा व्यवसाय करतात."
पोलिस म्हणाले - हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न
याप्रकरणी मंगळुरू पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हा जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचे पोलिस म्हणत आहेत. हे बॅनर कोणी लावले याचा तपास सुरू असल्याचे मंगळुरूचे पोलिस आयुक्त शशी कुमार यांनी सांगितले. एखाद्या संघटनेने तक्रार दाखल केल्यास, विधिज्ञांचा सल्ला घेतला जाईल. तहसीलदारांना घटनास्थळी पाठवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.