आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Karnataka Bans Trains And Planes From Five States; Includes Maharashtra And Gujarat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगळुरू:पाच राज्यांतून येणाऱ्या रेल्वे, विमानांवर कर्नाटकची बंदी; महाराष्ट्र, गुजरात राज्यांचा समावेश

बंगळुरू10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारी देशांतर्गत उड्डाणे सुरू झाल्यापासून 16 प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे आढळले

कर्नाटक सरकारने महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांतून येणारी विमाने व रेल्वेंवर बंदी घातली आहे. या राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ही दक्षता घेण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे.

कायदा मंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी सांगितले, २५ मे रोजी देशांतर्गत विमान उड्डाणे सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. महाराष्ट्रातून आलेले ३०-४० टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बंगळुरूत येणाऱ्यांची संख्या अपेक्षेपेक्षाही अधिक आहे. दरम्यान, महाराष्ट्र, राजस्थान व गुजरातमधून रस्ते मार्गाने येणाऱ्या वाहनांवर पुढील आदेश येईपर्यंत बंदी कायम असेल. कर्नाटकात गेल्या २४ तासांत ७५ नवे रुग्ण सापडले. आतापर्यंतची ही संख्या २,४९३ आहे.

इंडिगोच्या ४ विमानांत १२ कोरोनाबाधित

इंडिगोच्या चार विमानांतून प्रवास करणारे आणखी १२ प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. या रुग्णांत काहीही लक्षणे नव्हती. सोमवारी देशांतर्गत उड्डाणे सुरू झाल्यापासून असे १६ प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे.

बातम्या आणखी आहेत...