आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Bidar Accident Updates, Auto Rikshaw Collided With Truck, 7 Women Laborers Killed, 6 Injured

कर्नाटकात ऑटो रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात:कामावरून घरी परतताना 7 महिला मजुरांवर काळाचा घाला, 6 जखमी

बिदरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील बिदरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा ऑटो रिक्षा आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 7 महिलांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जखमी झाल्या. हा अपघात चित्तगुप्पा तालुक्यातील एका गावाजवळ घडला. या महिला मजूर असून काम आटोपून रिक्षात बसून घरी परतत असताना बेमलाखेडा शासकीय शाळेजवळ रिक्षाची ट्रकला धडक बसली.

पार्वती (40), प्रभावती (36), गुंडम्मा (60), यदम्मा (40), जगम्मा (34), ईश्वरम्मा (55) आणि रुक्मिणीबाई (60) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.

या अपघातातील जखमींवर बिदरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातातील जखमींवर बिदरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रिक्षा आणि ट्रकच्या अपघातात 7 महिलांचा जागीच मृत्यू झाला.
रिक्षा आणि ट्रकच्या अपघातात 7 महिलांचा जागीच मृत्यू झाला.

बिदर पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात जखमी झालेले बुडामनहल्ली गावातील रहिवासी असून त्यांना उपचारांसाठी बिदरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : यमुना एक्सप्रेस वेवर अपघात: दोन कारची समोरासमोर धडक; 4 जण ठार, 4 जखमी

उत्तर प्रदेशातील यमुना एक्सप्रेस वेवर शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मथुरा जिल्ह्यातील सुरीर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. शुक्रवारी रात्री यमुना एक्सप्रेसवेच्या माइलस्टोन 87 येथे दोन कारची धडक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी मथुरा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत. पूर्ण बातमी येथे वाचा

बातम्या आणखी आहेत...