आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka BJP Candidate Ticket List; Laxman Savadi Resigns | Basavaraj Bommai | Karnataka

कर्नाटकच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचा भाजपचा राजीनामा:तिकीट न मिळाल्याने सोडला पक्ष; नुकतीच 187 उमेदवारांची यादी झाली जाहीर

बंगळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजीनामा दिल्यानंतर लक्ष्मण सवादी म्हणाले की, मी गुरुवारी आणखी कठोर निर्णय घेईन आणि शुक्रवारी कामाला सुरुवात करेन. - Divya Marathi
राजीनामा दिल्यानंतर लक्ष्मण सवादी म्हणाले की, मी गुरुवारी आणखी कठोर निर्णय घेईन आणि शुक्रवारी कामाला सुरुवात करेन.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवादी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी बुधवारी सांगितले की, मी गुरुवारी आणखी कठोर निर्णय घेईन आणि शुक्रवारी माझे काम सुरू करेन. त्यांच्या राजीनाम्याबाबत प्रदेश काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांनी ते आमच्या संपर्कात नसल्याचे म्हटले आहे.

मंगळवारी सायंकाळी जाहीर झाली भाजपच्या उमेदवारांची यादी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी रात्री 189 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात केवळ 8 महिला आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शिगगावमधून निवडणूक लढवणार आहेत. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे सुपुत्र बीवाय विजयेंद्र आपल्या वडिलांच्या शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. आता फक्त 34 नावांची घोषणा व्हायची आहे. सीएम बोम्मई म्हणाले - दुसरी यादीही लवकरच जाहीर केली जाईल.

मंत्री आर. अशोक कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. शिवकुमार यांच्या विरोधात

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी त्यांच्या पारंपरिक चिकमंगळूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मंत्री आर. अशोक यांना दोन जागांवरून उमेदवारी देण्यात आली आहे. ते कनकापुरा आणि पद्मनाभनगर मतदारसंघातून राज्य काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत.

मंत्री व्ही. सोमन्नाही दोन जागांवर नशीब आजमावतील. वरुणा मतदारसंघातून त्यांची लढत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी होणार आहे. पक्षाने त्यांना चामराजनगरमधून तिकीटही दिले आहे. आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर के. हे चिक्कबल्लापूरमधून, तर मंत्री डॉ. अश्वथनारायण हे सीएन मल्लेश्वरम मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत.

भाजपने ओबीसीमधून 32, एससीमधून 30, एसटीमधून 16 आणि 5 वकिलांना तिकीट दिले आहे. केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात ही यादी जाहीर केली.

शेट्टर बंडखोरीच्या तयारीत

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. पक्षाने त्यांना निवडणूक न लढवण्याचे जाहीर करण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी नकार दिला. ते निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. यावर माध्यमांनी प्रश्न विचारला असता प्रधान म्हणाले की, पक्ष त्यांची समजूत काढणार आहे.

पाहा भाजप उमेदवारांची पूर्ण यादी....

ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांचा निवडणूक लढवण्यास नकार

कर्नाटक भाजपचे ज्येष्ठ नेते केएस ईश्वरप्पा यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहिले आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. ते म्हणाले की, मी बंगळुरू येथे झालेल्या कर्नाटक भाजप निवडणूक समितीच्या बैठकीत माझ्या निर्णयाबद्दल सांगितले होते, परंतु पक्षाचे नेते प्रल्हाद जोशी, नलिन कुमार कटील आणि इतर नेत्यांनी माझा निर्णय नाकारला.