आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka BJP MLA Kumaraswamy Attacked By Villagers In Chikkamagaluru Latest News And Update

हत्तीने महिलेला अन् लोकांनी आमदाराला मारले:मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते भाजप आमदार कुमारस्वामी

चिक्कमंगलुरु11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटकच्या मुदिगेरेचे भाजप आमदार एम पी कुमारस्वामी यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने ग्रामस्थांनी थेट त्यांच्यावर हल्ला केला.  - Divya Marathi
कर्नाटकच्या मुदिगेरेचे भाजप आमदार एम पी कुमारस्वामी यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने ग्रामस्थांनी थेट त्यांच्यावर हल्ला केला. 

चिक्कमंगलुरुच्या हल्लेमने गावातील नागरिकांनी मुदिगेरेच्या भाजप आमदाराला बेदम मारहाण केली आहे. हे आमदार महोदय हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या एका महिलेच्या शोकसंतप्त कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले होते. तिथे ग्रामस्थांनी त्यांना हत्तींचे हल्ले रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांची माहिती विचारली. त्याचे त्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. यामुळे पारा चढलेल्या ग्रामस्थांनी त्यांना चांगलाच चोप दिला.

अंगरक्षकांनी वाचवले, वाहनाची तोडफोड

कुंधूर येथे राहणारी 45 वर्षीय महिला शोभा रस्त्याशेजारी बनलेल्या गार्डमध्ये गवत कापत होत्या. तेव्हा हत्तीने तिला ठार मारले. ही घटना इदुवली बगिचात घडली. यामुळे गावकऱ्यांनी प्रशासनाचा विरोध सुरू केला. याच लोकांशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या आमदार कुमारस्वामी यांना जमावाने घेरले.

अंगरक्षकांनी त्यांची सुटका करून त्यांना गाडीपर्यंत पोहोचवले. ते गाडीत बसलेही. पण लोकांनी त्यांच्या गाडीची मोडतोड करून त्यांचे कपडे फाडले. यामुळे ते कसेतरी स्वतःचा जीव वाचवून निघून गेले.

आमदाराचा आरोप -हे माझ्याविरोधातील कट कारस्थान

कुमारस्वामी म्हणाले की, "काही लोकांनी जाणिवपूर्वक ग्रुप तयार करून मला ठार मारण्याचा कट रचला. त्यांनी हत्ती माझा असल्याची अफवा पसरवली. तिथे 10 पोलिस होते. त्यांनी मला तेथून जाण्यास सांगितले. माझी जाण्याची इच्छा नव्हती. माझी तिथे थांबून जनतेची समस्या ऐकण्याची इच्छा होती."

3 महिन्यातील तिसरी घटना

मागील 3 महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. 2 महिन्यांपूर्वी पास हरगोडूमध्ये आनंद देवाडिगा नामक फॉरेस्ट रेंजरचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उरुबागे गावातील जंगताल अर्जुन नामक व्यक्तीचा बळी गेला होता. आता शोभा हत्तीच्या हल्ल्याला बळी गेला आहे. स्थानिकांनी या प्रकरणी वन विभागावर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप केला आहे.

बातम्या आणखी आहेत...