आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान दिले नाही तर कामही करणार नाही:भाजप आमदाराची मुस्लिमांना धमकी; म्हणाले - तुमच्या मदतीचा काहीच फायदा नाही

बंगळुरू4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रीतम गौडा हासनचे भाजप आमदार आहेत. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.  - Divya Marathi
प्रीतम गौडा हासनचे भाजप आमदार आहेत. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात केवळ एक आवाज ऐकू येत आहे - मतदान नाही तर कामही नाही. दावा केला जात आहे की, हा आवाज कर्नाटकच्या हासनचे भाजप आमदार प्रीतम गौडांचा आहे. ते आपल्या विधानसभेतील एका गावात मुस्लिम मतदारांशी कन्नडमध्ये संवाद साधत होते. ते म्हणाले - तुम्ही मला मतदान करत नाही तोपर्यंत मी तुमचे पर्सनल काम करणार नाही.

हा व्हिडिओ केव्हाचा आहे हे अजून स्पष्ट झाले नाही. दिव्य मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. कर्नाटकात पुढील वर्षी मे महिन्याच्या अगोदर म्हणजे पुढील 6 महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहेत. सध्या तिचे भाजपचे सरकार असून, बसवराज बोम्मई मुख्यमंत्री आहेत.

VIDEOमध्ये ऐकावयास येत आहेत या 5 गोष्टी

1. पुन्हा धोका दिला तर मी तुम्हाला भेटणार नाही

यासंबंधीच्या वृत्तानुसार, ते जे बोलत आहेत, त्याचा अर्थ आहे, "तुम्ही मला 3 निवडणुकीत धोका दिला. 6 महिन्यांत पुन्हा निवडणूक होईल. त्यात तुम्ही मला पुन्हा धोका दिला, तर मी तिथेच असेन, पण तुमच्यासाठी नाही. तुम्ही माझ्या घरी आलात तर मी तुम्हाला कॉफी पाजवून परत पाठवेन. तुमचे कोणतेही काम करणार नाही."

2. मुस्लिमांना भाऊ मानले

प्रीतम म्हणाले, "मी काम केले असेल व तुम्ही माझी मदत करत नसाल तर तुमची मदत करण्याचा काहीच फायदा नाही. मी आतापर्यंत मुस्लिमांकडे भाऊ म्हणून पाहिले. भविष्यातही असेच करेल."

3. मदत करण्याचा काहीच फायदा नाही

ते पुढे म्हणाले, "मी काम केले असेल व त्यानंतरही तुम्ही माझी मदत करत नसाल तर माझ्या मते मदत करण्याचा काहीच फायदा नाही. मी असा निर्णय घेऊ नये ही तुमची जबाबदारी आहे. पाणी, रस्ते व इतर कामे होतील. कारण, ते माझे कर्तव्य आहे. पण मी तुमचे कोणतेही पर्सनल काम करणार नाही."

4. तुम्हीही मजुरी न मिळाल्याने नाराज होता

ते म्हणाले, "मी तुम्हाला माझ्या कामाची मजुरी म्हणून मतदान मागत आहे. तुम्ही सर्वजण मजूर आहात. तुमच्या कामाचा मेहनताना न मिळाल्यास तुम्ही नाराज होता. त्यानुसार काम करूनही तुम्ही मला मतदान देत नसाल तर मी नाराज होणार नाही असे तुम्हाला वाटत नाही काय?"

5. मी 4 वर्षांपासून आमदार, दशकांपर्यंत सत्तेत राहणाऱ्यांनी कोणतेही काम केले नाही

ते म्हणाले - "मी मागील 4 वर्षांपासून आमदार आहे. ज्या लोकांनी अनेक वर्षांपर्यंत सत्तेचा आनंद घेतला, त्यांनी या भागाच्या विकासासाठी कोणतेही काम केले नाही. एच डी देवेगौडा एकदा मुख्यमंत्री होते. त्यांचे सुपुत्र एच डी कुमारस्वामीही दोनवेळा मुख्यमंत्री राहिले. एच डी रेवन्ना 4 वेळा मंत्री राहिले. हे सर्वजण तुमच्या भागात गेले होते का? यावेळीही ते आश्वासनांची लांबलचक यादी घेऊन येतील. या 4 दशकांत त्यांनी तुमच्यासाठी एखादे काम का केले नाही?"

बातम्या आणखी आहेत...