आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकात भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत कुमार यांना 40 लाख रुपयांची लाच घेताना गुरुवारी अटक करण्यात आली. वडिलांच्या बंगळुरू येथील कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड (KSDL) कार्यालयातून ही अटक करण्यात आली. कर्नाटक लोकायुक्तांनी त्यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे. यानंतर लोकायुक्त अधिकारी प्रशांत यांच्या घरी पोहोचले. येथे त्यांना 6 कोटी रोख मिळाले. मोजणी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी नोटांचे बंडल बेडवर ठेवले होते.
भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांनी KSDL च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुलाने ज्या टेंडरमध्ये लाच घेतली त्यात माझा सहभाग नसल्याचे त्यांनी सांगितले. विरुपक्षप्पा यांच्या राजीनाम्यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले होते की, लोकायुक्त पुन्हा आणण्याचे उद्दिष्ट राज्यातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे आहे.
बंगळुरू लाचखोरीची 2 छायाचित्रे...
प्रशांत हे बंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळ (BWSSB) चे मुख्य लेखा अधिकारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून रोखीने भरलेल्या तीन बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी लोकायुक्तांनी भाजप आमदारालाही आरोपी केले आहे. मात्र, भाजपचे आमदार विरुपक्षप्पा यांनी कोणत्याही टेंडरमध्ये सहभाग असल्याचा इन्कार केला आहे.
प्रशांत यांनी 80 लाख रुपयांची लाच मागितली
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हे कर्नाटक प्रशासकीय सेवेतील 2008 च्या बॅचचे अधिकारी आहेत. साबण आणि इतर डिटर्जंट बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्यासाठी त्यांनी एका कंत्राटदाराकडून 80 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर ठेकेदाराने लोकायुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर प्रशांत यांना रंगेहात पकडण्याची योजना आखण्यात आली.
ही रक्कम KSDL चे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्याकडून घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लाच घेणारे आरोपी पिता-पुत्र आहेत.
प्रशांतचे वडील म्हणाले - माझा कोणत्याही टेंडरमध्ये सहभाग नाही
प्रशांतचे वडील मदल विरुपक्षप्पा हे कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरीचे आमदार आहेत. ते म्हणाले- मला याबाबत कोणतीही माहिती नाही. याची माहिती मला प्रसारमाध्यमांद्वारे मिळाली. माझा मुलगा आता लोकायुक्तांच्या ताब्यात असल्याने मी याबाबत त्यांच्याशी बोललो नाही. माझा कोणत्याही टेंडरमध्ये सहभाग नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.