आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka BJP MLA Viral Video Updates । Aravind Limbavali Misbehaves With Woman | Bangalore Latest News

भाजप आमदाराचे महिलेशी गैरवर्तन:आमदाराने केली शिवीगाळ, पोलीस कोठडीत पाठवले; भिंत पाडल्याची तक्रार करायला गेली होती

बंगळुरूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एका भाजप आमदाराने महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये भाजपचे आमदार अरविंद लिंबावली एका महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहेत. शुक्रवारी आपल्या इमारतीची भिंत पाडल्याची तक्रार करण्यासाठी ही महिला आमदाराकडे गेली होती. महिलेने आमदाराकडे अर्ज करण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने लिंबवली याने महिलेच्या हातातील अर्ज हिसकावून घेतला.

आमदार एवढ्यावरच थांबले नाहीत, तर पोलिसांना महिलेला ताब्यात घेण्यास सांगितले. पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात नेले, जिथे तिच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. महादेवपूर विधानसभा मतदारसंघातील राजकालू परिसराची पाहणी करण्यासाठी आमदार आले होते. आठवडाभरापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचले आहे.

सोमवारी बंगळुरू शहरात मुसळधार पावसामुळे राजकालू परिसरात पाणी साचले. हा परिसर अरविंद लिंबावली यांच्या विधानसभा मतदारसंघांतर्गत येतो.
सोमवारी बंगळुरू शहरात मुसळधार पावसामुळे राजकालू परिसरात पाणी साचले. हा परिसर अरविंद लिंबावली यांच्या विधानसभा मतदारसंघांतर्गत येतो.

काँग्रेसने म्हटले - लिंबावली आमदार होण्याच्या लायकीचे नाहीत

या घटनेवरून विरोधी पक्ष काँग्रेसने राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी शनिवारी लिंबावलीच्या वर्तनाचा निषेध केला आणि ते म्हणाले की ते आमदार होण्यास पात्र नाहीत. ते म्हणाले की, राज्यात भाजप सरकार सत्तेवर राहू शकत नाही.

आरोपांना उत्तर म्हणून आमदाराने पाणी साचल्याचे फोटो पोस्ट केले

काँग्रेसच्या आरोपाला उत्तर देताना लिंबावली म्हणाले- मी माफी मागायला तयार आहे. परंतु तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्या रुथ सगाई मेरी यांनी राज नाल (पावसाचे पाणी काढून टाकण्यासाठीचा कालवा) अनेक वर्षांपासून कब्जा करून लोकांना त्रास दिला. त्यांना ही जागा साफ करण्यास सांगा. यासोबतच त्यांनी परिसरातील पाणी साचल्याची छायाचित्रेही ट्विट केली आहेत.

राजकालू परिसरात पाणी साचल्याने येथील रहिवाशांना घराबाहेर पडता येत नाही.
राजकालू परिसरात पाणी साचल्याने येथील रहिवाशांना घराबाहेर पडता येत नाही.

पाण्याचा निचरा होण्यात अडचणी

बंगळुरू पाणीपुरवठा मंडळ आणि मलनिस्सारण ​​मंडळाने मेरीच्या व्यावसायिक इमारतीची भिंत पाडली. हे बेकायदा बांधकाम असून कालव्याच्या जमिनीवर बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्या मालक आहेत. सरकारी सर्वेक्षकाकडून सर्वेक्षण करून विभागाची मंजुरी घेऊन ही भिंत बांधल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सोमवारी झालेल्या पावसामुळे महादेवपूर विधानसभा मतदारसंघातील अनेक भागांत पाणी साचले होते. गुरुवारी दुपारी आमदारांनी नल्लूरहल्ली येथील अतिक्रमण जागेला भेट दिली. यानंतर राज कालव्याला लागून असलेल्या इमारतीचा काही भाग बुलडोझरच्या सहाय्याने पाडण्यात आला.

आमदाराने तुरुंगात टाकण्याची दिली धमकी

महिला कार्यकर्ती म्हणाल्या- 'आमदार लिंबावली यांनी पोलिसांना सांगून मला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. ते मला म्हणाले - तुम्हाला काही मान-सन्मान आहे का? जमिनीवर कब्जा करून आता माझ्यासमोर आल्या आहात. पोलिसांनी मला पोलीस ठाण्यात नेऊन बसवले. महिलेने सांगितले की, BBMP (बृहत बेंगळरू महानगर पालिक) 1971 मध्ये बांधलेली तिची मालमत्ता पाडण्याचा प्रयत्न करत आहे. कोणतीही अडचण असली तरी सार्वजनिक ठिकाणी आमदार महिलेला योग्य वागणूक देऊ शकले असते.

बातम्या आणखी आहेत...