आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील पावागडजवळ बस उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर विद्यार्थ्यांसह 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तुमकूर पोलिसांनी सांगितले की, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना बेंगळुरू रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याचवेळी पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे.
गत आठवड्यातही महाराष्ट्रातील भाविकांचा कर्नाटकात अपघाती मृत्यू
मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यातील कलबुर्गी येथे एक भीषण रस्ता अपघात झाला होता. या अपघातात कार झाडावर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातातील सर्व बळी महाराष्ट्रातील अहमदनगर येथील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी गंगापूर येथील दत्तात्रेय मंदिरातून परतत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.