आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka CM Siddharmaiya | Deputy CM DK Shiv Kumar| Karnataka Cabinet Expansion

भेटीगाठी:सिद्धरामय्या - DKS काँग्रेस श्रेष्ठींना भेटले; मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा; पक्षाध्यक्ष खरगेंचीही भेट घेण्याची शक्यता

नवी दिल्ली12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी गुरुवारी कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला व पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांची भेट घेतली. पक्षाच्या वॉर रूम 15, गुरुद्वारा रकाबगंज रोड येथे झालेल्या या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रदिर्घ चर्चा करण्यात आली.

यापूर्वी सिद्धरामय्या व शिवकुमार यांनी वेणुगोपाल यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली होती. दोन्ही नेते आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर नेत्यांचीही भेट घेऊ शकतात.

डीकेंनी पक्षातील फुटीच्या अफवा फेटाळल्या
कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार बुधवारीच दिल्लीत पोहोचले होते. तर सिद्धरामय्या रात्री दिल्लीत पोहोचले. डीके यांनी दिल्ली गाठून पक्षांतर्गत मतभेदाच्या अफवा फेटाळून लावल्या. ते म्हणाले की, राज्याचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी पक्षात कोणतीही फूट नसल्याचे सांगू शकतो. पक्षात कोणतेही अंतर्गत मतभेद नाहीत.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या व डीके शिवकुमार हे दोन मोठे उमेदवार होते. त्यानंतर सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली.
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या व डीके शिवकुमार हे दोन मोठे उमेदवार होते. त्यानंतर सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली.

लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार
डी के म्हणाले की, हा नियमित दौरा आहे. आम्हाला लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे. त्यावर काम सुरू आहे. राज्याच्या प्रश्नांवर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली जाईल. 20 मे रोजी सिद्धरामय्या व डीके यांच्यासह 8 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, अद्याप खातेवाटप झाले नाही. कर्नाटक सरकारमध्ये जास्तीत जास्त 34 मंत्री असू शकतात. अशा स्थितीत लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

कर्नाटकशी संबंधित खालील बातम्या वाचा....

राजकारण:कर्नाटक सरकारचे हिजाब बंदी मागे घेण्याचे संकेत; मंत्री खरगे म्हणाले- गरज भासल्यास वादग्रस्त कायदे रद्द केले जातील

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील कर्नाटक सरकारने राज्यातील शाळा व महाविद्यालयांतील हिजाब बंदी मागे घेण्याचे संकेत दिलेत. कॅबिनेट मंत्री प्रियांक खरगे यांनी म्हटले आहे की, काँग्रेस सरकार घटनाबाह्य व एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या अधिकारांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वच कायद्यांचे पुनरावलोकन करेल. या कायद्यांचा राज्याच्या प्रतिमेवर परिणाम होत असेल, तर ते रद्दही केले जातील.

ते म्हणाले, सरकार आपल्या भूमिकेवर अगदी स्पष्ट आहे. आर्थिक धोरणांविरोधात असणाऱ्या मागील सरकारच्या सर्वच विधेयक व परिपत्रकांचा आढावा घेतला जाईल. ते घटनाबाह्य असतील तर गरज भासल्यास ते रद्द केले जातील. कर्नाटक सरकार लवकरच शाळा-कॉलेजांमधील हिजाब बंदी मागे घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर प्रियांक यांचे हे विधान आले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...

वाद:मोदींना नव्या संसदेचे उद्घाटन करता येणार नाही का? केंद्राने दिला इंदिरा - राजीव गांधींचा दाखला, पण सत्य वेगळे

सर्वप्रथम पाहा, भारताच्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची निमंत्रण पत्रिका...

त्यात नमूद करण्यात आले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन होील. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित राहणार आहेत. ही निमंत्रण पत्रिका उजेडात येताच विरोधी पक्षांनी केंद्रावर हल्लाबोल सुरू केला.

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावर काँग्रेससह 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले, 'लोकशाहीचा आत्मा संसदेतून बाहेर काढला जात असताना आम्हाला नवीन इमारतीची कोणतीही किंमत दिसत नाही.'

भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यासंबंधी इंदिरा गांधी व राजीव गांधी या काँग्रेसच्या 2 पंतप्रधानांचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, जेव्हा इंदिराजी संसदेच्या अॅनेक्सीचे व राजीव गांधी संसदेच्या ग्रंथालयाचे उद्घाटन करू शकतात, तर मग पंतप्रधान मोदी का नाही? असा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...