आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक निवडणुकीच्या निकालात कॉंग्रेस पूर्ण बहुमताने जिंकण्याच्या मार्गावर आली आहे. कॉंग्रेसचा विजय होताच मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असेल? याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या या शर्यतीत सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार टॉपवर आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल काही वेळातच स्पष्ट होणार आहेत.
निकालापूर्वीच्या ट्रेंडने काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत असल्याचे अगदी स्पष्ट झाले आहे. सकाळी 8 वाजेपासून राज्यात मतमोजणी सुरू झाली. 10 मे रोजी मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाव्यतिरिक्त जेडीएसमध्ये चुरशीची लढत दिसून आली आहे.
ट्रेंडनुसार राज्यात कॉंग्रेसचे सरकार स्थापन होणार हे अगदी निश्चित झाले आहे. मात्र काँग्रेस विजयानंतर तर पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या या शर्यतीत सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार आघाडीवर आहे.
सिद्धरमय्या म्हणाले- शिवकुमार स्पर्धक पण उमेदवार निश्चित नाही
दरम्यान, आउटलुकने दिलेल्या वृत्तात सिद्धरमय्या यांना मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यात आणि शिवकुमार यांच्यात मतभेद आहेत का, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा ते म्हणाले होते की, 'काँग्रेसने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, ते एक स्पर्धक जरूर आहेत.
मुख्यते कर्नाटकात निकालापूर्वी पक्ष मुख्यमंत्र्यांचा चेहरा कधीच उघड करत नाही, असा काँग्रेसमध्ये प्रघात आहे. ही एक अतिशय लोकशाही प्रक्रिया असून जी वर्षानुवर्षे या ठिकाणी सुरू आहे. बहुमताने पक्ष सत्तेवर आल्यास प्रथम निवडून आलेले आमदार आपले मत मांडतील. त्यानंतर 'हायकमांड' त्यावर निर्णय घेतात.
दोन्ही नेत्यात तीव्र स्पर्धा
काँग्रेसला बहुमत मिळाल्यास सिद्धरामय्या आणि डीकेएस यांच्यातील सर्वोच्च पदासाठीची लढाई तीव्र होईल. असे पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या एका आमदाराचे म्हणणे आहे की, सिद्धरमय्या हे अधिक अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना सरकार चालवण्याचा अनुभव आहे. तर डीकेएस हे आव्हानात्मक नेते आहेत आणि सोनिया गांधींचे अतिशय विश्वासू मानले जातात. मात्र, अंतिम निर्णय 'हायकमांड'चाच असणार आहे.
कोण आहेत सिद्धरमय्या ?
कोण आहेत डीके शिवकुमार
निवडणूकीसंदर्भातील अन्य बातम्या वाचा
काँग्रेसचे संकटमोचक:कर्नाटक, गुजरातमध्ये राखली पक्षाची प्रतिष्ठा; कोण आहेत डीके शिवकुमार? वाचा सविस्तर
कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे राजकारणातील अनुभवी खेळाडू आहेत. 7 वेळा आमदार राहिलेले डीके शिवकुमार यांनीही कर्नाटकात मंत्रिपद भूषवलेले आहे. डीके शिवकुमार हे कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचक मानले जातात. जेव्हा-जेव्हा कर्नाटक किंवा गुजरातमध्ये कॉंग्रेस संकटात सापडली, तेव्हा डीके शिवकुमार यांनीच पक्षाला अडचणीतून बाहेर काढले. - येथे वाचा संपूर्ण बातमी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कलांमध्ये काँग्रेस 118, भाजप 75 आणि जेडीएस 25 जागांवर आघाडीवर आहे. अपक्षांच्या खात्यात 6 जागा जाताना दिसत आहे. निवडणूक आयोगानुसार काँग्रेस 95 जागांवर, भाजप 64 जागांवर, जेडीएस 22 आणि अपक्ष 5 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसला 43.7 टक्के, भाजपला 36.6 टक्के आणि जेडीएसला 11.8 टक्के मते मिळत आहेत. जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी म्हणाले की, दोन ते तीन तास थांबा, सर्व काही स्पष्ट होईल. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जेडीएसशी संपर्क साधल्याच्या वृत्त त्यांनी फेटाळले.- येथे वाचा संपूर्ण बातमी...
सावधगिरी:घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेस आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवणार? डीके शिवकुमार यांनी स्पष्टच सांगितले
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे शनिवारी (13 मे 2023) मतमोजणी सुरू आहे. आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले की, मी आपल्या आमदारांना कुठेही घेऊन जात नाही, जोपर्यंत विधानसभा निवडणुकीचे निकाल येत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे काम करत राहू. गुरुवारी आणि शुक्रवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या दोन बैठका झाल्या. शुक्रवारच्या बैठकीनंतर पत्रकारांनी शिवकुमार यांना विचारले की, ते आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवत आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की नाही, सध्या ते फक्त निकालाची वाट पाहत आहेत. ते म्हणाले की आम्ही फक्त आमचे काम करत आहोत आणि आता निकालाची वाट पाहत आहोत. - येथे वाचा संपूर्ण बातमी...
राजकारण:मोदी सरकारने लोकशाहीचा खून केला, कर्नाटकात 5 वर्षात भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा समोर आला; नाना पटोलेंचा घणाघात
नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीचा खून करण्येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.