आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka | Congress MLAs Meeting Update | DK Shivakumar | Siddaramaiah | Rahul Gandhi | Mallikarjun Kharge

खरगे करणार नव्या मुख्यमंत्र्याची निवड:विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय; निरीक्षक सर्व आमदारांशी रात्री वन-टु-वन बोलणार

बंगलोर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकात स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता कोणाला मुख्यमंत्री करायचे हे काँग्रेसला ठरवायचे आहे? यासाठी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बंगळुरू येथील शांग्री-ला हॉटेलमध्ये बैठक झाली. डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यासह सुशील कुमार शिंदे, दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंह या तीन निरीक्षकांच्या उपस्थितीत ठरवण्यात आले की काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेच विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करतील. सिद्धरामय्या यांनी हा प्रस्ताव मांडला होता, त्याला शिवकुमार यांच्यासह सर्व आमदारांनी पाठिंबा दिला.

मल्लिकार्जुन खरगे यांनी निरीक्षकांना सर्व आमदारांशी वन टू वन चर्चा करण्यास सांगितले आहे. बैठकीदरम्यान शिवकुमार-सिद्धरामय्या समर्थकांनी हॉटेलबाहेर घोषणाबाजी केली.

मुख्यमंत्रीपदावर 3 विधाने

1. डीके म्हणाले- सिद्धरामय्यांशी मतभेद नाहीत
शिवकुमार म्हणाले- काही जण माझे सिद्धरामय्यांशी मतभेद असल्याचा दावा करतात. पण आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मी पक्षासाठी त्याग करत सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभा राहिलो.

2. मुख्यमंत्रीपदासाठी 2 नव्हे, 4 दावेदार
कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामलिंगा रेड्डी म्हणाले- AICC अध्यक्ष व सरचिटणीस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्वांचे विचार ऐकून मुख्यमंत्र्यांची निवड करतील. सर्वच पक्षात महत्त्वकांक्षी नेते असतात. पण एकच मुख्यमंत्री होतो. निवड आमदार व हायकमांड करतील. केवळ शिवकुमार व सिद्धरामय्याच नाही तर एमबी पाटील व जी परमेश्वर यांचीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे.

3. मुख्यमंत्र्यांच्या नावाची 2-3 दिवसांत घोषणा
काँग्रेस नेते सय्यद नसीर म्हणाले - पुढील 2-3 दिवसांत मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाईल. सध्या मंत्रिमंडळ स्थापन करण्याची तयारी सुरू आहे.

कर्नाटक अपडेट्स...

  • काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बेंगळुरूहून दिल्लीला रवाना झालेत.
  • सिद्धरामय्या, प्रियांक खरगे यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. प्रियांक म्हणाले - ही बैठक राजकीय नव्हती.
  • काँग्रेसने कर्नाटकमध्ये सुशील कुमार शिंदे, दीपक बावरिया व भंवर जितेंद्र सिंह यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

आता पाहा काही महत्त्वाचे फोटो...

वृषभ देशकेंद्र प्रमुख संत यांचे आशीर्वाद घेण्यासाठी डीके शिवकुमार आपल्या कुटुंबासह रविवारी नोनाविंकरे काडसिद्धेश्वर मठात पोहोचले.
वृषभ देशकेंद्र प्रमुख संत यांचे आशीर्वाद घेण्यासाठी डीके शिवकुमार आपल्या कुटुंबासह रविवारी नोनाविंकरे काडसिद्धेश्वर मठात पोहोचले.

नोनाविंकरे मठातून विजयाचा आशीर्वाद मिळाला

नोनाविंकरे काडसिद्धेश्वर मठाच्या प्रमुखांची भेट घेतल्यानंतर शिवकुमार म्हणाले - हा मठ माझ्यासाठी पवित्र स्थान आहे. स्वामीजींनी मला नेहमीच मार्गदर्शन केले आहे. प्राप्तिकर विभागाचे छापे पडले तेव्हाही स्वामींनी मला पूर्ण मार्गदर्शन केले. मी 134 जागा मागितल्या. मला त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या.

काँग्रेसच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बंगळुरूमधील भगवान श्री मारुती मंदिरात कार्यकर्ते 'उरुलु सेवा' करताना.
काँग्रेसच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बंगळुरूमधील भगवान श्री मारुती मंदिरात कार्यकर्ते 'उरुलु सेवा' करताना.
काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या बंगळुरू स्थित घराबाहेर लावण्यात आलेले श्रीराम व हनुमानाचे पोस्टर्स काढण्यात आलेत.
काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या बंगळुरू स्थित घराबाहेर लावण्यात आलेले श्रीराम व हनुमानाचे पोस्टर्स काढण्यात आलेत.
हरपनहल्ली मतदारसंघातील अपक्ष उमेदवार लता मल्लिकार्जुन यांनी विजयानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली. लतांनी काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
हरपनहल्ली मतदारसंघातील अपक्ष उमेदवार लता मल्लिकार्जुन यांनी विजयानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली. लतांनी काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेस नेते भाई जगताप, संजय निरुपम व इतर कार्यकर्त्यांनी रविवारी मुंबईतील एका मंदिरात हनुमान चालीसा पठन केले.
कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेस नेते भाई जगताप, संजय निरुपम व इतर कार्यकर्त्यांनी रविवारी मुंबईतील एका मंदिरात हनुमान चालीसा पठन केले.

पराभवानंतर शेट्टर यांचा आरोप - पैसा काहीही बदलू शकतो

निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये दाखल झालेले जगदीश शेट्टर यांचा महेश तेंगीनाकई यांनी 34,000 मतांनी पराभव केला. हुबळी-धारवाड मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या शेट्टर यांनी आपल्या मोठ्या विजयाचा दावा केला होता. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते म्हणाले की, पैसा काहीही बदलू शकतो. भाजपने निवडणुकीपूर्वी मतदारांना 500 व 1000 रुपये वाटले.

काँग्रेस कार्याध्यक्ष म्हणाले - डीके, सिद्धरामय्यांसह आणखी 2 दावेदार
कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामलिंगा रेड्डी म्हणाले- AICC अध्यक्ष व सरचिटणीस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्वांचे विचार ऐकून मुख्यमंत्र्यांची निवड करतील. सर्वच पक्षात महत्त्वकांक्षी नेते असतात. पण एकच मुख्यमंत्री होतो. निवड आमदार व हायकमांड करतील. केवळ शिवकुमार व सिद्धरामय्याच नाही तर एमबी पाटील व जी परमेश्वर यांचीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे.

कर्नाटक अपडेट्स...

  • काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लवकरच दिल्लीत पोहोचतील.
  • सिद्धरामय्या यांनी घरून सोडले. काँग्रेस कार्यालयात पोहोचणार.

डीके शिवकुमार यांनी जयनगरमध्ये रात्री उशिरा धरणे आंदोलन केले, तिथे भाजपचा अवघ्या 16 मतांनी विजय

जयनगर मतदार संघात रात्री उशिरा मतमोजणी झाली. तिथे डीके शिवकुमार व काँग्रेस नेत्यांनी असे ठाण मांडले होते.
जयनगर मतदार संघात रात्री उशिरा मतमोजणी झाली. तिथे डीके शिवकुमार व काँग्रेस नेत्यांनी असे ठाण मांडले होते.

जयनगर जागेवर रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. येथे काँग्रेसने सौम्या रेड्डी, तर भाजपने राममूर्ती यांना उमेदवारी दिली होती. मतमोजणीवेळी गोंधळ झाला. त्यानंतर पुन्हा मतमोजणी झाली. त्यात राममूर्ती अवघ्या 16 मतांनी विजयी झाले. त्यानंतर डीके शिवकुमार यांनी मतमोजणी केंद्राबाहेर धरणे आंदोलन केले. मतमोजणीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाल्याचा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी म्हणाले- प्रेमाची दुकाने उघडली, द्वेषाचा बाजार बंद झाला

राहुल गांधींनी शनिवारी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी अशा पद्धतीने पत्रकारांना शांत राहण्याचा इशारा केला.
राहुल गांधींनी शनिवारी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी अशा पद्धतीने पत्रकारांना शांत राहण्याचा इशारा केला.

कर्नाटक निवडणुकीचा निकाल आल्यानंतर राहुल गांधींनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी पत्रकारांचे 6 वेळा अभिवादन केले. ते म्हणाले- काँग्रेस कर्नाटकातील गरिबांच्या पाठीशी उभी आहे. त्यांच्या प्रश्नांवर आम्ही लढलो. ही लढाई आम्ही द्वेषाने व अपशब्दांनी लढली नाही. आम्ही प्रेमाने लढलो. या देशाला प्रेम आवडते, हे कर्नाटकने दाखवून दिले. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला. प्रेमाची दुकाने उघडली. आम्ही दिलेली 5 आश्वासने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण केली जातील.

आता व्यंगचित्रकार मन्सूर नक्वी यांच्या नजरेतून बघा कर्नाटकची निवडणूक...