आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचाराला वेग घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत पंतप्रधानांच्या सलग सहा सभांनंतर आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक नवीन मोहीम सुरू केली आहे, ज्याला त्यांनी ‘PayCM CryPM’ असे नाव दिले आहे. ही मोहीम प्रियांका गांधी यांनी कर्नाटकच्या सभेत दिलेल्या विधानानंतर सुरू झाली होती, ज्यात त्यांनी म्हटले होते की, पंतप्रधान सतत त्यांचे दुःख रडत असतात.
सोशल मीडियावर सुरू झालेल्या 'CryPM' मोहिमेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा QR कोडवर चिकटवला आहे. प्रियांका गांधी मोदींवर टीका करतानाचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे. यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेसने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरोधात PayCM मोहीम सुरू केली होती.
बोम्मई म्हणाले - काँग्रेस 9 वर्षांपासून रडते
बसवराज बोम्मई यांनी काँग्रेसच्या CryPM मोहिमेचा बदला घेतला आहे. सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले, पंतप्रधान कधीही रडले नाहीत. गेल्या 9 वर्षांपासून काँग्रेसच रडत आहे आणि लोकांनाही काँग्रेसवाल्यांबद्दल सहानुभूती नाही.
प्रियंका म्हणाल्या होत्या, पंतप्रधान त्यांचे दु:ख सांगत बसतात
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी रविवारी कर्नाटकातील जमखंडी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधानांवर टीका केली होती. प्रियांका म्हणाल्या होत्या की, मी असे पहिले पंतप्रधान पाहिले आहेत, जे लोकांसमोर येतात आणि मला शिव्या दिल्या जात असल्याचे सांगतात. लोकांचे दु:ख ऐकण्याऐवजी पंतप्रधान त्यांचेच दु:ख लोकांसमोर मांडतात.
मोदीजींनी माझ्या भावाकडून शिकावे, असे प्रियंका म्हणाल्या होत्या. माझा भाऊ म्हणतो की, देशाच्या फायद्यासाठी मी शिवीच काय तर गोळी झेलायलाही तयार आहे. पंतप्रधानांनी 91 वेळा शिवी दिल्याची यादीच तयार केली आहे. या लोकांनी माझ्या कुटुंबाला दिलेल्या सर्व शिव्यांची यादी बनवण्यासाठी तर संपूर्ण पुस्तक छापावे लागेल.
PayCM मोहीम गेल्या वर्षी सुरू झाली
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये काँग्रेसने कर्नाटकातील भाजप सरकारला लक्ष्य करत बेंगळुरूमध्ये PayCM पोस्टर्स लावले होते. या पोस्टर्समध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या चित्रासह एक क्यूआर कोड देण्यात आला होता, जो स्कॅन केल्यावर काँग्रेसने बनवलेली वेबसाइट उघडते.
40% सरकार नावाच्या या वेबसाइटवर काँग्रेसने भाजपच्या राजवटीत कर्नाटकात 40% कमिशन दर कसे सामान्य झाले हे सांगितले होते. त्यावेळी या PayCM मोहिमेची बरीच चर्चा झाली होती. आता निवडणुका जवळ आल्या असताना काँग्रेसने या PayCM मोहिमेत CryPM जोडले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.