आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक:उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या कारच्या धडकेने शेतकऱ्याचा मृत्यू

बागलकोटएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांचा मोठा मुलगा चिदानंदच्या कारच्या धडकेने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. अपघात सोमवारी सायंकाळी बागलकोट जिल्ह्यातील हुंगंड येथे झाला. मृताच्या कुटुंबीयांनी चिदानंदवर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. चिदानंदच्या वेगात असलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. यात ५८ वर्षांचा शेतकरी कुडलेप्पा बोली जखमी झाले. नंतर खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले की, चिदानंद आणि त्यांच्या मित्रांनी एका स्थानिक तरुणालाही मारहाण केली. तो कारचे छायाचित्र घेत होता. त्या लोकांनी छायाचित्र उडवून दिले. तर चिदानंदने सांगितले, मी मित्रांसोबत अंजनाद्री हिल्सवरून परत येत होतो. अपघाताच्या वेळी मी दुसऱ्या कारमध्ये होतो. माझ्या मित्रांनी मला अपघाताबद्दल सांगितले. तेव्हा मी घटनास्थळी आलो. जखमीला रुग्णालयात नेण्यासाठी आम्ही मदत केली. दुर्दैवाने त्याचे निधन झाले. मी त्याच्या कुटुंबीयांशी बोलणार आहे.

सावदी म्हणतात मुलाने दहा वर्षांपूर्वीच कार चालवणे साेडले : उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी म्हणाले, माझ्या मुलाने १० वर्षांपूर्वीच कार चालवणे सोडून दिले आहे. आमचा चालक गाडी चालवत होता.

बातम्या आणखी आहेत...