आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कर्नाटकात लपून-छपून देवदासी प्रथा सुरू; संख्या 90 हजार, प्रथेपासून बचावासाठी 22 वर्षीय तरुणीची देवदासी प्रशासनाकडे धाव

विजयनगरहून मनाेरमा सिंह2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 40 हजारांवर देवदासी : सरकार

एकविसवे शतक असले तरी कर्नाटकमधील अनेक भागांत देवदासी ही कुप्रथा सुरूच आहे. फेब्रुवारीमध्ये २२ वर्षीय रुद्रम्माने (बदललेले नाव) देवदासी हाेण्यास विराेध करत देवदासी निर्मूलनासाठी केंद्राची मदत मागितली हाेती. त्यामुळे जागे झालेल्या प्रशासनाने तिचा बचाव केला. तिचा शाेध घेत तिची कुडलिगी गावातील घरी भेट घेतली. तेव्हा रुद्रम्मा आईसाेबत मजुरीसाठी शेतावर निघाली हाेती. रुद्रम्मा म्हणाली, कुप्रथेपासून माझा बचाव झाला असला तरी माझ्या काैटुंबिक पार्श्वभूमीमुळे माझ्या प्रियकराच्या कुटुंबाने विवाहास नकार दिला आहे. आता या तणावातून बाहेर पडून माझ्या कुटुंबास मदत करण्यासाठी मजुरी करत आहे. अशा प्रकारचे जीवन वाट्याला येईल, अशी कल्पनाही मी केली नव्हती. मी शिक्षण घेत हाेते. नृत्य, नाटक यात मला रस हाेता. त्यामुळे मी संगीत संस्थेत प्रवेश घेतला हाेता. परंतु मी सेक्स वर्करच्या कुटुंबातून आल्याचे त्यांना कळाल्यानंतर संस्था व परिसरातील लाेकांनी मला टाेकण्यास सुरुवात केली. मग सगळे साेडावे लागले. शाळेचे दिवस रुद्रम्माच्या दृष्टीने सर्वात चांगले हाेते. शाळेमुळे प्रतिष्ठित घरातील मुलीही माझ्या मैत्रिणी हाेत्या. परंतु वय वाढत जाताच सामाजिक दुजाभाव जाणवू लागला. काहीही झाले तरी देवदासींच्या मुलींनी या कुप्रथेचा भाग हाेता कामा नये. मुलीला देवदासी का बनवले या प्रश्नावर रुद्रम्माची आई उत्तर देत नाही. पण पुन्हा सांगू लागते, विवाहापासून दूर राहण्यासाठी रुद्रम्मा खाेटे बाेलली हाेती. देवदासी हाेण्यासाठी आई व कुटुंबाकडून दबाव टाकला जात आहे, अशी तक्रार रुद्रम्माने पाेलिसांत केली. तिला स्थानिक मंदिराला साेपवले जाणार हाेते. परंतु पाेलिसांनी वेळीच तिची सुटका केली. नंतर तिला या प्रथेशी जाेडले जाणार नसल्याचे तिच्या आईने लिखित स्वरूपात आश्वासन दिले हाेते. कुडलिगेमध्ये एखाद्या मुलीला या प्रथेसाठी साेडण्याची सुरुवात मारम्मा मंदिरापासून केली जाते. मंदिराला समर्पित झाल्यानंतर तिचे शाेषण हाेते. जिल्हा प्रशासनाने मंदिरात अशा प्रथेवर प्रतिबंध लागू केला आहे. परंतु काही मंदिरांत लपून-छपून ही प्रथा चालवली जाते.

१२० गावांत ३ हजार देवदासी, ९० टक्के महिला मागास वर्गातील
स्थानिक पत्रकार किरण कुमार बलन्नावरन म्हणाले, विजयनगरच्या हुडलिगे तालुक्यात १२० गावे येतात. याच गावात सुमारे तीन हजार देवदासी राहतात. त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारची आहे. ९० टक्के देवदासी मागास वर्गातील आहेत. देवदासी बचाव पुनर्वसन अभियानात सक्रिय गाेपाल नायक म्हणाले, देवदासीचा भाऊ सामान्य जीवन जगताे. त्याच्या पत्नीला या प्रथेत सामील केले जात नाही. परंतु ही प्रथा चालवण्याची जबाबदारी मुलींवर टाकली जाते. राज्य सरकारने २००८ मध्ये पाहणी केली. त्यात देवदासींची सध्याची संख्या सुमारे ४० हजार ६०० आहे. परदेशी संस्था व कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या अध्ययनानुसार कर्नाटकात ९० हजार देवदासी आहेत. उत्तर कर्नाटकात २० टक्क्यांहून जास्त देवदासी १८ वर्षांहून कमी वयाच्या आहेत. ही कुप्रथा असूनही लपून-छपून हे प्रकार केल जात आहेत. ते रोखण्यासाठी समाजाने देखील पुढाकार घेतला पाहिजे. त्याचबरोबर सामाजिक संस्थांनी देखील निगराणी ठेवली पाहिजे, असे जाणकारांना वाटते.

बातम्या आणखी आहेत...