आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Election 2023 | Parties Stuck In Issues And Faces, BJP's Trust In Modi And Maths, But Congress Without A Face In The Field

कर्नाटक निवडणूक 2023:मुद्दे आणि चेहऱ्यात अडकले पक्ष, भाजपची भिस्त मोदी व मठांवर तर चेहऱ्याविनाच काँग्रेस मैदानात

सुजित ठाकूर | नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विधानसभा निवडणूक मतदानाला आता ३५ दिवस उरले आहेत. सत्ताधारी भाजपकडे चांगले मुद्दे नाहीत, तर काँग्रेस नुकसानीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करण्याचे टाळत आहे.

कर्नाटकची निवडणूक भाजप ३ घटक केंद्रस्थानी ठेवून लढणार आहे.पक्षाच्या बाजूने वातावरण निर्मितीचा निर्णय भाजप सरचिटणीसांच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात भक्कम मुद्यांअभावी भाजप मोदी, मंडल व मठाच्या जोरावर जिंकण्याची रणनीती आखत आहे. उमेदवार निश्चितीपूर्वी तेथील परिस्थितीचा आढावा अहवाल पक्षासाठी उत्साहवर्धक नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कर्नाटक हे एकमेव राज्य आहे जिथे २०१९ नंतर निवडणुका झाल्या आहेत, जिथे प्रमुख विरोधी काँग्रेस सर्वात मजबूत स्थितीत आहे. काँग्रेसला अतिरिक्त फायदा म्हणजे भाजपची सत्ता आहे व मुख्यमंत्री येदियुरप्पा नाहीत. ते सीएम असते तर काँग्रेसला वैयक्तिक हल्ला करणे घातक ठरले असते. कारण येदी लिंगायतांचे सर्वमान्य नेते आहेत. या अहवाला ठळकपणे म्हटले की, भाजपच्या बाजूने निवडणुकीचे वातावरण तयार करण्यासाठी पक्ष मोदी-मंडल आणि मठांभोवती निवडणूक रणनीती तयार करत आहे. दुसरा घटक म्हणजे मुस्लिम अल्पसंख्याकांचे ४% आरक्षण रद्द करून लिंगायत व वोक्कलिगा समुदायांत विभाजन करणे. तिसरा मुद्दा म्हणजे टिपू सुलतान, हिजाब व किनारी कर्नाटक प्रदेशातील मुस्लिम तुष्टीकरणाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणे.

भाजपपुढील आव्हाने {दुसऱ्या पक्षांऐवजी भाजपतून काँग्रेसमध्ये जाणारे जास्त. घराणेशाही, भ्रष्टाचाराचे आरोपही लागले आहेत. {लोकप्रियतेच्या बाबतीत मुख्यमंत्री वेगळे नाहीत. राज्य सरकार, भाजप खासदारांप्रती लोकांची नाराजी. संघटना आणि सरकार यांच्यात मतभेद.

चेहऱ्याविनाच काँग्रेस मैदानात अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर न करता काँग्रेस निवडणूक लढवेल.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पक्षातील वाढती गटबाजी संपवण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.पंतप्रधान मोदींवर थेट हल्लाबोल करणार नसल्याचे संकेतही मिळाले आहेत. उर्वरित उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून त्यांना एकजुटीने निवडणूक लढविण्यास सांगण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी सिद्धरामय्या म्हणाले होते की, राज्यात सरकार स्थापनेची परिस्थिती उद्भवल्यास ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील. यावर शिवकुमार नाराज झाले. उर्वरित उमेदवारांच्या यादीत नाराजीचा परिणाम दिसला. उत्सुकांच्या यादीत प्रत्येक जागेसाठी एकापेक्षा जास्त उमेदवारांची नावे होती. त्यावर पक्ष नेतृत्वाने राज्यातील नेते आणि प्रदेश प्रभारी सरचिटणीस यांना एका जागेवरून एक अशी यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या. काँग्रेसचेे प्रदेश प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले की, कर्नाटकात १० आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून अनेकजण काँग्रेसमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवू पाहत आहेत.

अनेक सीएम दावेदार {सिद्धरामय्यांसोबत डीके हे स्वतः सीएमच्या दावेदारांत आहेत. तसेच एमबी पाटील व परमेश्वरनचाही समावेश आहे. {२२४ सदस्यीय विधानसभेसाठी पक्षाने १२४ उमेदवार निवडणूक घोषित होण्यापूर्वीच जाहीर केले होते. उर्वरितांची घोषणा केली नाही.