आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गुरुवारी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात ४२ नावे आहेत. दुसऱ्या यादीत ४२ लोकांची नावे आहेत. या यादीत चकित करणारे नाव गुरमिटकल जागेवरून बाबूराव चिंचनसूर यांचे आहे. बाबूराव गेल्या महिन्यातच भाजपमधून काँग्रेसमध्ये आले होते. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आयुष्यातील पहिल्या राजकीय पराभवात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. गुरमिटकल जागा काँग्रेससाठी खूप महत्त्वाची आहे. कारण, खरगे येथून सलग आठ वेळा आमदार झाले आहेत. बाबूराव यांच्याशिवाय भाजपमधून आलेले दुसरे माजी आमदार एन.वाय. गोपालकृष्ण यांना मोलकालमुरू जागेवर संधी मिळाली आहे. जेडीएसमधून निलंबित ४ वेळचे आमदार एसआर श्रीनिवास यांना काँग्रेसने गुब्बीतून तिकीट दिले. दुसऱ्या यादीतही कोलार जागेचा उल्लेख नाही. या जागेवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी सीएम सिद्धरामय्या निवडणूक लढवू इच्छितात. अन्य पक्षांतून आलेल्या तिघांना तिकीट दिले आहे. काँग्रेसने २२४ पैकी १६६ मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत.
प्रतीक्षा : भाजपची यादी उद्या येण्याची शक्यता नावे निश्चित करून केंद्राला पाठवणार कर्नाटक प्रदेश भाजप उमेदवारांच्या नावांना अंतिम रूप देत आहे. त्यांची पहिली यादी ८ एप्रिलला जाहीर होऊ शकते. भाजप संसदीय मंडहाचे सदस्य बीएस येदियुरप्पा गुरुवारी म्हणाले की, अंतिम नावे शुक्रवारी केंद्रीय समितीला पाठवले जातील. केंद्रीय संसदीय मंडळाची बैठक ८ एप्रिल रोजी होणार आहे. तोवर यादी येऊ शकते.
ऑटोरिक्षाचालकांना आकर्षित केले जातेय या निवडणुकीत तीन प्रमुख पक्षांचा ऑटोरिक्षाचालकांवर भर आहे. हे ऑटोरिक्षाचालक मोठी मतपेढी झाले आहेत. जेडीएसने आश्वासन दिले की, सरकार आल्यास त्यांना दरमहा २००० रु. दिले जातील. भाजपने चालकांच्या मुलांना विद्या निधी बजेट देऊ केले आहे. काँग्रेस नेते डीके शिवकुमार चालकांसोबत कार्यक्रम घेत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.