आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकमध्ये ८ मे रोजी प्रचार थंडावेल. १० मे रोजी मतदान होईल तर १३ मे रोजी निकाल जाहीर होईल. संपूर्ण प्रचार मोहिमेत भाजपवर ४० टक्के कमिशनखोरीचा आरोप लावण्यात काँग्रेसची सिद्धरामय्या-डीके शिवकुमार ही जोड यशस्वी ठरली. स्थानिक मुद्द्यांवरून काँग्रेसने भाजपला घेरल्याचेही दिसून आले. दुसरीकडे तिकीट वाटपानंतर बंडखोरी, नेतृत्वावरून संभ्रम, जुन्या नेत्यांनी दिलेली सोडचिठ्ठी, डगमगलेला लिंगायत पाठिंबा यात भाजपला आता हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाकडून अपेक्षा आहेत. त्यामुळेच बजरंगबलीचा मुद्दा उचलण्यात आला.
मोदी-शहा-नड्डा यांच्या सलग जाहीर सभांमधील उत्साहामागे हिंदुत्वाचा हुंकार आहे. निवडणुकीत काय होईल? मंगळुरू विद्यापीठाशी संबंधित राजकीय विश्लेषक एन. विवेक म्हणाले, भाजपला येथे कधीही बहुमत मिळालेले नाही, हे अंकगणित सांगते. २०१३ मध्ये काँग्रेसचे बहुमताचे सरकार आले होते. पुन्हा २०१८ मध्ये भाजप सत्ताविरोधी वातावरण निर्माण करण्यात यशस्वी ठरले आणि पक्षाने येदियुरप्पांच्या रूपाने मुरब्बी नेतृत्वही दिले. तरीही बहुमत मिळाले नव्हते. परंतु आता येदियुरप्पा युग संपत आल्याची जाणीव भाजपच्या मोठ्या नेत्यांना झाली. राजकीय जाणकार सिद्धार्थ शेट्टी म्हणाले, भाजप व संघाने दलित, आेबीसी, आदिवासींमध्ये विश्वास निर्माण केला आहे.
कर्नाटकचे सहा विभाग ...सर्वांचा मतदानाचा पॅटर्न वेगळा
मुंबई-कर्नाटक क्षेत्र : जागा-50
2018: भाजप ३०, काँग्रेस १७, जेडीएस २, इतर १
2013: भाजप १६, काँग्रेस ३१, जेडीएस १ इतर २
लिंगायत, कुरुबा, एससी, एसटी, मदिगा, मुस्लिम मतदार जास्त. भाजपसाठी टक्का वाचवण्याचे आव्हान. दिग्गज लिंगायत नेते काँग्रेसमध्ये गेल्यामुळे भाजपला फटका बसू शकतो. बेळगाव मोठा जिल्हा आहे. १५ जागा भाजपकडे आहेत. मुख्यमंत्री बोम्मई, सावदी सावकार परिवारातील तीन सदस्य भाजप, काँग्रेस, जेडीएसकडून मैदानात.
ओल्ड म्हैसूर : जागा-59
2018: भाजप ८, काँग्रेस २०, जेडीएस २९, इतर २
2013: भाजप २, काँग्रेस २७, जेडीएस २५, इतर ५
जेडीएसचा मोठा गड. यंदा काँग्रेस बळकट दिसते. भाजपने वोक्कालिगा आरक्षण ५ ते ७ % करून डाव खेळला. काँग्रेस-जेडीएसच्या मतांची विभागणी होईल, अशी भाजपला अपेक्षा आहे. सिद्धरामय्या, कुमारस्वामी प्रमुख नेते आहेत.
कल्याण कर्नाटक क्षेत्रात : जागा-40
2018: भाजप १५, काँग्रेस २१, जेडीएस ४, इतर 0
2013: भाजप ११, काँग्रेस २३, जेडीएस ५ , इतर १
लिंगायत, मुस्लिम, एससी लेफ्ट, एससी राइट, एसटी, कुरुबा समुदायाचा प्रभाव. काँग्रेसचे वर्चस्व आहे. भाजपला आरक्षणातील फेरबदलातून लाभाची अपेक्षा. परंतु काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा येथे प्रभाव दिसतो. खरगे यांच्याव्यतिरिक्त जगदीश शेट्टार, बी. श्रीरामलु व रेड्डी बंधू येथील मोठे नेते आहेत.
मध्य कर्नाटक : जागा-28
2018: भाजप २३, काँग्रेस ५, जेडीएस 0, इतर 0
2013: भाजप ६, काँग्रेस १५, जेडीएस ६, इतर-१
येथे लिंगायत, कुरुबा, एससी, एसटीच्या विशिष्ट वर्गाचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली. यंदा भाजप-काँग्रेसमध्ये कडवी झुंज दिसते. भाजपने शक्ती पणाला लावली. शिव शंकरप्पा व एम.व्ही. पाटील यांचा प्रभाव आहे.
कर्नाटकचे राजकारण विविध समुदायांत विभागले
- 17% लिंगायत मतदार, प्रभाव 75-80 जागांवर.
- 14% वोक्कालिगा मतदार, प्रभाव 50-55 मतदारसंघात
- 9.5% कुरबा मतदार, प्रभाव 25-30 जागांवर
- 32% एससी/एससी, प्रभाव 30-35 जागी
- 17% मुस्लिम मतदार, प्रभाव 35-40 जागांवर
(भाजपचे 104 पैकी 49 आमदार लिंगायत, वोक्कालिगा)
यंदा... भाजपचे ३८, काँग्रेस ३६, जेडीएसचे ३१ उमेदवार एससी आहेत. काँग्रेसचेे १५, जेडीएसचे २० उमेदवार मुस्लिम आहेत. भाजपचा एकही उमेदवार या वर्गांतील नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.