- Marathi News
- National
- Karnataka Election 2023 | Modi Vs Congress, Modi Said, "Punish The Congress By Saying 'Jai Bajrangbali' While Pressing The Button In The Polling Station."
कर्नाटकात बजरंगबलीवरून राजकारण:मोदी म्हणाले, ‘मतदान केंद्रात बटण दाबताना ‘जय बजरंगबली’ म्हणत काँग्रेसला शिक्षा द्या’
दिव्य मराठी नेटवर्क | बंगळुरूएका महिन्यापूर्वी
- काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचा मुद्दा मांडल्यानंतर कर्नाटकमध्ये नवे नाट्य
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून बजरंग दलावर बंदीच्या घोषणेनंतर कर्नाटकातील राजकारणात बजरंगबलीचा प्रवेश झाला आहे. भाजपने हा थेट बजरंगबलीवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांनी बुधवारी रॅलीदरम्यान केलेल्या भाषणाची सुरुवात ‘बजरंगबली की जय’ घोषणेने केली. हेही म्हणाले की, काँग्रेस भाजपला पराभूत करू शकत नाही. म्हणून कर्नाटकचे मतदार त्यांना धडा शिकवतील. मतदान केंद्रात ते बटण दाबताच ‘जय बजरंग बली’ म्हणत त्यांना शिक्षा देतील.’ दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता संपूर्ण कर्नाटकात ‘हनुमान चालिसा’चे पठण करण्याची घाेषणा भाजपने केली आहे.
- कर्नाटकातील अंकोलामधील रॅलीमध्ये पीएम मोदी.
- बजरंग दलावरील बंदीच्या बाजूने छत्तीसगड-राजस्थान
- छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, बजरंग दलावर बंदी घालण्याचे मी म्हणालो नाही. बजरंग दलाने कायदा हातात घेतला तर बंदीबाबत विचार करू.
- राजस्थानचे मंत्री गोविंद मेघवाल म्हणाले, कर्नाटक व राजस्थान वेगवेगळे नाहीत. बजरंग दलाचे लोक गुन्हा करतील तर आम्ही विरोध करू. तर मप्रचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्यावर टीका करत म्हणाले, ते हनुमानाचे मोठे भक्त बनतात. त्यांनी उत्तर दिले पाहिजे.