आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक निवडणूक:बजरंगबलीने दिली काँग्रेसला संजीवनी ! 34 वर्षांनंतर कर्नाटकात काँग्रेस पक्षाचा विराट विजय

दिव्य मराठी नेटवर्क | बंगळुरू15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्हैसूरमध्ये गांधी जयंती दिनी राहुल यांचे पावसात भाषण झाले होते. - Divya Marathi
म्हैसूरमध्ये गांधी जयंती दिनी राहुल यांचे पावसात भाषण झाले होते.

कर्नाटकमध्ये बजरंग दलावर बंदीच्या काँग्रेसच्या घोषणेनंतर भाजपने थेट बजरंगबलीचा अवमान केल्याचा मुद्दा तापवला खरा परंतु त्याचा परिणाम झाला नाही. काँग्रेसने गतवेळेसपेक्षा ४ टक्के जास्त मते घेत १३६ जागांसह भक्कम बहुमत मिळवले. शिवाय हिजाब बंदी सारखे मुद्दे निकाली काढून दक्षिण भारत भाजपमुक्त केला. आता संपूर्ण दक्षिण भारतातील एकाही राज्यात भाजपचे सरकार नाही. कर्नाटकमध्ये सन १९८९ नंतर काँग्रेसचा हा सर्वात मोठा विजय ठरला. त्यावेळी काँग्रेसला १७८ जागा मिळाल्या होत्या.

सर्वात मोठे लिंगायत नेते येदियुरप्पाही आपल्या समाजाची मते एकसंध ठेवण्यात यशस्वी ठरले नाही. दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे मात्र माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांना एकत्र ठेवण्यात यशस्वी ठरले. भाजप नेते आता म्हणत आहेत की, पंप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह यांनी एकापाठोपाठ सभा- रोड शो घेतले नसते तर परिस्थिती आणखीनच बिकट झाली असती. मोदी-शाह यांनी ४७ मतदारसंघांमध्ये सभा घेतल्या. त्यापैकी १४ जागा भाजपने जिंकल्या.मात्र १२ मंत्री पराभूत झाले.

ठळक कारणे ... काँग्रेसचा विजय, भाजपच्या पराभवाची ही ठरली कारणे

जेडीएसच्या किल्ल्यात भाजपचा उदय, लाभ काँग्रेसला...५९ जागांचे जुने म्हैसूर जेडीएसचा गड आहे. येथे भाजपला गेल्या वेळेपेक्षा ८ टक्के जास्त मते पडली. परंतु विजय मिळाला नाही. ही मते जेडीएसची होती. त्यामुळे जेडीएसच्या १२ जागा घटल्या. काँग्रेसच्या वाढून ४४ झाल्या. म्हणजे जेडीएसचे नुकसान, काँग्रेसला फायदा झाला. ४० टक्के कमिशन..भाजपने प्रत्येक सभेत मुद्दे बदलले. परंतु काँग्रेसने संपूर्ण निवडणूक प्रचारात ४० टक्के कमिशनचा मुद्दा मांडला. सप्टेंबर २०२२ मध्ये पेटीएमच्या धर्तीवर मुख्यमंत्री बोम्मई यांना पेसीएम संबोधणारे पोस्टर झळकावले होते.

सहा महिन्यांपूर्वी उमेदवारी.. काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी सहा महिन्यांपूर्वी उमेदवार ठरवून त्यांना कळवले होते. म्हणूनच आैपचारिक घोषणेपूर्वीच उमेदवार रिंगणात होते. भाजपत तिकिट वाटपाचा घोळ शेवटपर्यंत होता.

ध्रुवीकरणाचा डाव उलटला...

भाजपने ४ टक्के मुस्लिम कोटा संपवून वोक्कालिगा व लिंगायत समुदायांत वाटला. काँग्रेसने निर्णय बदलण्याचे आश्वासन दिले. हिजाब बॅनची घोषणा करणारे शिक्षणमंत्री बी.सी. नागेशही पराभूत झाले. हिजाब बंदीच्या विरोधात सभा घेणाऱ्या काँग्रेसच्या फातिमा जिंकल्या.

अंतर्गत कलह...

निवडणुकीपूर्वीच नव्हे तर खूप आधीपासून भाजपमध्ये अंतर्गत कलहाचे वृत्त होते. कर्नाटक भाजपमध्ये अनेक गटतट तयार झाले होते. मुख्यमंत्री पदावरून हटवलेल्या येदियुरप्पांचा एक गट होता. दुसरा विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंचा, तिसरा राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष, चौथा नलिन कुमार जटील यांचा गट होता. पाचवा गट राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवींचा होता

तिकिट वाटपाने खेळखंडोबा.....
भारतीय जनता पक्ष अंतर्गत कलहाने त्रस्त होता. त्यातच तिकिट वाटपावरूनही गोंधळ झाला. पक्षाच्या अनेक दिग्गजांचे तिकिट कापणे भाजपला महागात पडले. पक्षातील नेत्यांच्या बंडानेही अनेक जागांवर भाजपला फटका बसला. १५ पेक्षा जास्त जागी भाजपच्या बंडखोरांनी निवडणूक लढवली. पक्षाचे मोठे नुकसान केले. जगदीश शेट्टार, लक्ष्मण सावदीसारखे दिग्ग्ज नेते पक्ष सोडून गेल्याने भाजपचे मोठे नुकसान झाले, असे चित्र पाहायला मिळाले.

भाजपसह इतर पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले २३ पैकी १६ नेते विजयी
भास्करच्या ‘माझी आई’ चित्रकला स्पर्धेत प्रत्येक वय, गटातील लोकांनी २१ हजार ५० प्रवेशिका पाठवल्या. प्रथम पुरस्कार वैभव श्रीवास्तव, दुसरा विनीता भट्ट, तिसरा प्रसंग सोनीला मिळाला आहे. प्रसंग सोनीच्या चित्रास एडिटर्स चॉइसअंतर्गत मास्टहेडसाठी मान मिळाला आहे.

३४ वर्षांनंतर कर्नाटकात काँग्रेस पक्षाचा विराट विजय
इतर 4 +1मते : 8% (+1.5%)लोकसभा 2019: एकाही विधानसभा मतदारसंघात आघाडी नाही. 2% मते.
जेडीएस 19 -18मते : 13% (- 5.3%)लोकसभा 2019: 12 विधानसभा मतदारसंघांत आघाडी तर,9.7% मते पडली होती.
भाजप 65 -39मते : 36% (- 0.2%)लोकसभा 2019: 177 विधानसभा मतदारसंघांत आघाडी, तर 51.7% मते होती.
काँग्रेस 136 +56मते : 43% (+ 4%)लोकसभा 2019: 35 विधानसभा मतदारसंघांत आघाडी तर, 31.1% मते मिळाली होती.
माझी आई..चित्रकला स्पर्धा : २१,०५० प्रवेशिकांपैकी निवडलेल्या सर्वोत्कृष्ट ३ चित्रकृती

कर्नाटकचा जनादेश
जागा- 224, बहुमत - 113

नंदिनीचा परिणाम : अमूलला प्रोत्साहन देण्याच्या भाजपच्या प्रयत्नानंतर राज्यातील दूध उत्पादकांनी नंदिनी दूधाच्या समर्थनार्थ आंदोलन केले. दूध उत्पादकांचा प्रभाव असलेल्या ५४ जागांपैकी काँग्रेसने ३२ जागा जिंकल्या.
मल्लिकार्जुन खरगेंचा जोर :

अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित असलेल्या एकूण ५२ जागांपैकी ३५ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला. काँग्रेसने प्रादेशिक मुद्यांवर पकड मजबूत ठेवली. दुसरीकडे, भाजपने राष्ट्रीय मुद्दे मांडले.

तिरस्काराचा बाजार बंद झाला...

तिरस्काराचा बाजार बंद आणि प्रेमाचे दुकान सुरू झाले. देशाला प्रेम आवडते, हे कर्नाटकने सिद्ध करून दाखवले. -राहुल गांधी.

काँग्रेसचे अभिनंदन..
काँग्रेसचे अभिनंदन. जनतेच्या आकांक्षांची पूर्ततेसाठी शुभेच्छा. -नरेंद्र मोदी