आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक निवडणूक-2023:दहशतवादी समाज पोखरताहेत, काँग्रेसची त्यांना साथ : PM मोदी

बंगळुरू | विनय माधवएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणूक ४ दिवसांवर आली आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा कर्नाटकात आले. त्यांनी शुक्रवारी बेल्लारीत सभा घेतली. त्यांनी सुरुवातच बजरंग बलीच्या जयजयकाराने केली. ते म्हणाले, काँग्रेसला तर माझ्या बजरंग बली म्हणण्यालाही आक्षेप आहे. पंतप्रधानांनी केरळ स्टोरी चित्रपटाबाबत सांगितले की, गेल्या काही वर्षांत दहशतवादाचे एक भयावह रूप निर्माण झाले आहे. अतिरेकी बॉम्ब, बंदुकीऐवजी समाजाला आतून पोखरत आहे. केरळ स्टोरी अशाच कथेवर अाधारित आहे. देशाचे दुर्दैव पाहा, काँग्रेस या दहशवादी प्रवृत्तीसोबत उभी असल्याचे दिसते. मोदी म्हणाले, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात अनेक खोटी आश्वासने आहेत.

नीट परीक्षेमुळे मोदींच्या दोन दिवसांच्या रोड शोच्या कार्यक्रमात बदल केला आहे. ६ मेचा रोड शो व्यापक असेल. ७ मे रोजी लहान असेल. हा सकाळी १० किमीचा असेल.

जुने म्हैसूर : ५४ जागा वोक्कालिगाबहुल, माेदींची लोकप्रियता कॅश करणार भाजप
जुन्या म्हैसूरमध्ये वोक्कालिगा बहुल भागात भलेही भाजपची मतपेढी कमी असली तरी या भागात पीएम मोदी खूप लोकप्रिय आहेत. जुन्या म्हैसूरच्या ८ जिल्ह्यांतील ५४ जागांपैकी ४० पेक्षा जास्त वोक्कालिगा बहुल आहेत. २८ मध्ये एकूण मतदारांपैकी वोक्कालिगा मतदार ५०% पेक्षा जास्त आहेत. किनारपट्टी आणि मलनाड भागातील १० जागांवर वोक्कालिगाच हार-जीत निश्चित करते. भाजपला पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करत असेल तर त्यांना जुन्या म्हैसूर भागातील वोक्कालिगाला आपल्या बाजूने वळवावे लागेल. भाजप नवे कथानक तयार करत आहे. कारण, डबल इंजिनचे सरकार, विकास व राष्ट्रीय सुरक्षेसारख्या घोषणेचा तत्काळ परिणाम पाडू शकत नाही.

रामनगर जिल्ह्यात, जिथे कुमारस्वामी आणि त्यांचे पुत्र निखिल निवडणूक लढत आहेत, तिथे जेडीएसला प्रथमच आव्हानांचा सामना करत आहे. देवेगौडा हासन जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये या कुटुुंबाबकडून अपेक्षाभंग होत आहे. निखिलना रामनगरमध्ये आव्हान मिळत आहे.

‘जय बजरंगबली, तोड भ्रष्टाचार की नली’ : खरगे
बजरंग दल वादादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, बजरंग बली आणि बजरंग दलाला समान ठरवणे चुकीचे आहे. मी ८० हून जास्त हनुमान मंदिरे स्थापन केली. माझा नारा-”जय बजरंग बली, तोड भ्रष्टाचार की नली|’ राहुल गांधी म्हणाले, सत्तारुढ भाजपला निवडणुकीत त्यांना ४० जागा मिळतील. भाजप सरकारने नोकऱ्या आणि बदल्यांत लाच घेतल्याच्या आरोप करत काँग्रेसने रेट कार्ड जारी केले होते. या जाहिरातीचा त्यांनी या वेळी हवाला दिला.