आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Election Controversy Update; Mallikarjun Kharge | Narendra Modi | Bajarang Dal

निवडणूक:6 व्यंगचित्रांत कर्नाटक निवडणुकीची 13 चर्चित विधाने; विषारी नाग ते विषकन्या अन् बजरंग दलावरील बंदी ते जय बजरंगबली

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेसाठी बुधवारी 69 टक्के मतदान झाले. यासंबंधी जारी झालेल्या 5 पैकी 4 एक्झिट पोल्समध्ये काँग्रेसची, तर अवघ्या एका पोलमध्ये भाजपची सत्ता येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2018 सारखाच यंदाजी जेडीएस किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. आता केवळ 13 मेच्या निकालाची प्रतीक्षा आहे.

कर्नाटकात 11 दिवस बड्या चेहऱ्यांच्या 35 रॅली व 45 रोड शो झाले. खरगे यांनी पीएम मोदींचा उल्लेख विषारी साप असा केल्यानंतर भाजपच्या एका नेत्याने सोनिया गांधींना थेट विषकन्या म्हटले.

मोदींनी 91 शिव्यांची यादी सांगितल्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या - तुम्ही आम्हाला केलेली शिवीगाळ मोजली तर पुस्तक छापावे लागेल.

बजरंग दलावरील बंदी बजरंगबली की जयपर्यंत पोहोचली. कर्नाटकच्या सार्वभौमत्वावर उपस्थित करण्यात आलेला प्रश्न निवडणूक आयोगाकडे गेला. काँग्रेसलाही नोटीस मिळाली.

चला तर मग मन्सूर नक्वी यांच्या 6 व्यंगचित्रांतून पाहूया या निवडणुकीतील 13 चर्चित विधाने...

एक- 27 एप्रिल, मल्लिकार्जुन खरगे, कलबुर्गी
पीएम मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही हे विष चाखण्याचा प्रयत्न केला, तर तुमचा मृत्यू निश्चित आहे.

दोन- 28 एप्रिल, भाजप आमदार बसनागौडा, कोप्पल
खरगे पंतप्रधानांची तुलना कोब्रा सापाशी करत आहेत. ते विष ओकत असल्याचा आरोप करत आहेत. पण तुम्ही ज्या पक्षात नाचता, त्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी स्वतःच विषकन्या आहेत?

तीन- 29 एप्रिल, नरेंद्र मोदी, बिदर
काँग्रेसने आतापर्यंत मला 91 वेळा शिवीगाळ केली. शिवीगाळीचा शब्दकोश तयार करण्यात काँग्रेसने वेळ वाया घालवला नसता तर त्यांची अशी दयनीय अवस्था झाली नसती.

चार - 30 एप्रिल, प्रियांका गांधी, जमखंडी
मोदीजींनी माझ्या भावाकडून धडे घ्यावेत. माझा भाऊ म्हणतो की, तो देशासाठी शिवीगाळ काय, तर गोळी झेलण्यासही तयार आहे. माझ्या घरच्यांना देण्यात आलेल्या शिव्यांची यादी तयार केली तर पुस्तक छापावे लागेल.

पाच – 1 मे, प्रियंका खरगे, कलबुर्गी
पीएम मोदींनी कलबुर्गी येथे बंजारा समाजाच्या लोकांना सांगितले होते की, 'घाबरू नका, दिल्लीत बंजारांचा एक मुलगा बसला आहे. असा नालायक मुलगा असेल तर कसे होईल भाऊ.

सहा – 2 मे, काँग्रेसचा जाहीरनामा, बंगळुरू
काँग्रेसचे सरकार आल्यास पीएफआय व बजरंग दलासारख्या संघटनांवर बंदी घालण्यात येईल.

सात- 2 मे, नरेंद्र मोदी, विजयनगर
आज हनुमानाच्या या पवित्र भूमीला नतमस्तक होणे माझ्यासाठी नशिबाची गोष्ट आहे. पण दुर्दैव पाहा, आज मी येथे हनुमानाला नतमस्तक होण्यासाठी येथे आलो असताना काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंगबलीला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी श्रीरामाला कुलूप ठोकले होते. आता जय बजरंगबली म्हणणाऱ्यांना बंद करण्याची शपथ घेतली आहे. हे देशाचे दुर्दैव आहे की, काँग्रेसला प्रभू श्री रामांचीही अडचण होत होती, आता जय बजरंगबली म्हणणाऱ्यांचीही अडचण होत आहे.

आठ- 2 मे, नरेंद्र मोदी, चित्रदुर्ग
बाटला हाऊस चकमक झाली तेव्हा दहशतवाद्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्याच्या डोळ्यात अश्रू तरळले.

नऊ - 3 मे, नरेंद्र मोदी, मूडबिद्री
तुम्ही मतदान केंद्रात बटण दाबाल तेव्हा त्यांना (काँग्रेसला) जय बजरंगबली म्हणत शिक्षा करा.

दहा – 5 मे, नरेंद्र मोदी, बेल्लारी
द केरला स्टोरी या चित्रपटाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. म्हणाले- गेल्या काही वर्षांत दहशतवादाचा आणखी एक भयानक प्रकार समोर आला आहे. बॉम्ब, बंदुका, पिस्तुलांचे आवाज ऐकू येतात, पण समाजाला आतून पोकळ करणाऱ्या दहशतवादी कारस्थानाचा आवाज येत नाही. न्यायालयानेही या दहशतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. द केरला स्टोरी अशाच एका कथेवर आधारित आहे.

देशाचे दुर्दैव पाहा, देशाला उद्ध्वस्त करणाऱ्या या दहशतवादी प्रवृत्तीच्या पाठीशी काँग्रेस उभी दिसत आहे. काँग्रेस अशा प्रवृत्तीच्या लोकांशी सत्तेसाठी मागच्या दरवाजाने व्यवहार करत आहे.

अकरा – 6 मे, राहुल गांधी, बेळगावी
दहशतवाद्यांनी माझ्या कुटुंबीयांची हत्या केली. माझ्या आजीला मारले. माझ्या वडिलांची हत्या केली. दहशतवाद म्हणजे काय हे मला पंतप्रधानांपेक्षा चांगले ठावूक आहे.

बारा- 7 मे, हुबळीत सोनियांच्या रॅलीनंतर काँग्रेसने ट्विट केले
काँग्रेस संसदीय पक्षाच्या (सीपीपी) अध्यक्षा सोनिया गांधी यांचा कर्नाटकच्या 6.5 कोटी जनतेला स्ट्राँग संदेश - काँग्रेस कर्नाटकची प्रतिष्ठा, सार्वभौमत्व व अखंडता धुळीला मिळू देणार नाही. 8 मे रोजी भाजपने निवडणूक आयोगाकडे सोनिया गांधींविरोधात तक्रार केली.

तेरा - 7 मे, नरेंद्र मोदी, नंजनगुड
सार्वभौमत्वावर काँग्रेसच्या ट्विटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले - या निवडणुकीत आता काँग्रेसच्या राजघराण्याने म्हटले आहे की, त्यांना कर्नाटकच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करायचे आहे. कर्नाटकची sovereignty म्हणजे कर्नाटकचे सार्वभौमत्व. एखादा देश स्वतंत्र होतो तेव्हा त्याला सार्वभौम राष्ट्र म्हणतात. त्यानुसार काँग्रेस भारतापासून कर्नाटक वेगळे करण्याचा खुलेपणाने पुरस्कार करत आहे. तुकडे-तुकडे टोळीचा रोग काँग्रेसमध्ये एवढा वरपर्यंत पोहोचेल, असे वाटले नव्हते.