आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसने मंगळवारी कर्नाटक निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यानंतर काही तासांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर निशाणा साधला. त्यांनी जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याच्या घोषणेचा संदर्भ देत सांगितले की, काँग्रेसने आधी भगवान रामाला कुलपात ठेवले आता जय बजरंग बली म्हणणाऱ्या लोकांना कुलपात बंद करू इच्छित आहेत.
विजयनगर जिल्ह्यातील हाेसापेटमध्ये निवडणूक सभेत मोदी म्हणाले, आज हनुमानजींच्या भूमीत अालो आहे हे माझे भाग्य आहे. मात्र, दुर्दैव पाहा आज, काँग्रेसने जाहीरनाम्यात हनुमानजींना कुलपात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आधी त्यांना भगवान रामाची अडचण होत होती. आता त्यांना बजरंग बली बोलणाऱ्यांची अडचण होत आहे. त्यांनी सांगितले की, भाजप कर्नाटकला अव्वल राज्य बनवण्यासाठी समर्पित आहे. भाजप कुणाला कर्नाटकचा सन्मान आणि संस्कृती नष्ट करण्याची परवानगी देणार नाही. त्यांनी विजयनगर साम्राज्याचे महान शासक कृष्णदेव राय यांचा आपल्या भाषणात उल्लेख केला.
संरक्षण दलांवर प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप
चित्रदुर्गमध्ये पीएम मोदींनी काँग्रेस व जेडीएसवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप लावला. त्यांनी सांगितले की, काँग्रेसचा दहशतवाद आणि दहशतवादाच्या तुष्टीकरणाचा इतिहास आहे. सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकवेळी काँग्रेसने संरक्षण दलांवर प्रश्न उपस्थित केले.
बजरंग दलाची हनुमानजींशी तुलना आक्षेपार्ह
काँग्रेसने हनुमानांसंदर्भात पीएम मोदींच्या टिप्पणीवर अाक्षेप घेतला. पक्षाने एका निवेदनात सांगितले की, हनुमानजींची तुलना बजरंग दलाशी करण्याबाबत पीएम मोदींनी माफी मागावी. त्यांनी सांगितले की, यामुळे धार्मिक भावनांना ठेच पोहोचेल. आधी रामांना, आता हनुमान भक्तांना काँग्रेस कुलपात ठेवू इच्छिते, असा आरोप मोदींनी केला.
पंतप्रधान मोदी आपल्यापुरते बोलतात, कर्नाटकातील भ्रष्टाचारावर गप्प : राहुल
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शिवमोगा जिल्ह्यातील तीर्थहल्लीतील निवडणूक सभेत सांगितले की, पीएम मोदी केवळ आपल्यासंदर्भात बोलतात. ते कर्नाटकातील भ्रष्टाचारावर गप्प आहेत. आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी सीएम येदियुरप्पा यांचे नाव का घेत नाहीत? राहुल म्हणाले, तुम्ही भाजपची सभा पाहिली आहे. ज्या पद्धतीने मी आपल्या नेत्याचे नाव घेतो तसे पीएम मोदी कुण्या नेत्याविषयी बोलत नाहीत.
राहुल म्हणाले, याची दोन कारणे आहेत. एक मोदी केवळ आपल्यासंदर्भात बाेलतात. उदाहरणार्थ, कर्नाटकची निवडणूक आणि अन्य लोक राज्यातील जनता, विकास आणि भ्रष्टाचाराबाबत चर्चा करतात. मात्र, मोदी यावर एक शब्दही बोलत नाहीत. भाजप सरकारने तीन वर्षांत काय केले.
राज्याच्या भाजप सरकारवर लोकशाही संपुष्टात आणत सत्तेत आल्याचा आरोप करत राहुल म्हणाले, पीएम मोदी भ्रष्टाचारावर गप्प का आहेत. कमीत कमी त्यांनी हे सांगावे की, भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी काय केले. कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने पीएमना पत्र लिहून ४०% कमिशनचा आरोप केला. मात्र, पीएमकडून उत्तर आले नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.