आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या गोटात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. पक्षाला मुबलक जागा मिळाल्या तर काँग्रेस विधीमंडळ पक्षाची रविवारी बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी शनिवारी सायंकाळपर्यंत विजयी उमेदवारांना राजधानी बंगळुरूला पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः कर्नाटकात तळ ठोकून आहेत. त्यांची राज्यातील घटनाक्रमावर बारकाईने नजर आहे. यावरून काँग्रेस दक्षिणेतील या महत्त्वाच्या राज्यात आपली सत्ता स्थापन करण्याची कोणतीही संधी हातातून जाऊ न देण्याच्या प्रयत्नांत असल्याचे स्पष्ट होते.
काँग्रेसचा प्लॅन बी
काँग्रेस यावेळी कोणत्याही स्थितीत कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याच्या मूडमध्ये आहे. पक्षाला राज्यात स्वबळावर सरकार स्थापन करण्यात अपयश आल्याच्या स्थितीत काँग्रेसने प्लॅन बी तयार केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आमदारांचा घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने हैदराबादेत एक रिसॉर्ट बुक केला आहे. पक्षाला बहुमतापेक्षा कमी जागा किंवा काठावरचे बहुमत मिळाले तर सर्वच नवनिर्वाचित आमदारांना या रिसॉर्टमध्ये ठेवले जाईल.
सुरुवातीच्या अंदाजांत काँग्रेसला स्पष्ट बहुमत
सकाळी 10.35 वाजेपर्यंतच्या सुरुवातीच्या कालांत काँग्रेसला 118 जागांवर आघाडी मिळाली होती. म्हणजे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. तज्ज्ञांच्या मते, या आकडेवारीत यापुढे फार मोठा बदल होण्याची कोणतीही शक्यता नाही.
दुसरीकडे, सत्ताधारी भाजप 76 व जेडीएस 24 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्षांनाही 6 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आतापर्यंत 209 जागांचे कल जाहीर करण्यात आलेत. यातही काँग्रेस 111 जागांसह आघाडीवर आहे. तर भाजप 71, जेडीएस 23 व इतरांना 5 जागांवर आघाडी मिळाली आहे.
कर्नाटक निवडणुकीशी संबंधित खालील बातम्या वाचा...
कर्नाटक विधानसभेचा निकाल:आयोगाच्या कलांमध्ये काँग्रेस 95 जागांवर पुढे, 43.7% मते, भाजपला 64 जागांवर आघाडी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कलांमध्ये काँग्रेस 118, भाजप 75 आणि जेडीएस 25 जागांवर आघाडीवर आहे. अपक्षांच्या खात्यात 6 जागा जाताना दिसत आहे.
निवडणूक आयोगानुसार काँग्रेस 95 जागांवर, भाजप 64 जागांवर, जेडीएस 22 आणि अपक्ष 5 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसला 43.7 टक्के, भाजपला 36.6 टक्के आणि जेडीएसला 11.8 टक्के मते मिळत आहेत.
जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी म्हणाले की, दोन ते तीन तास थांबा, सर्व काही स्पष्ट होईल. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी जेडीएसशी संपर्क साधल्याच्या वृत्त त्यांनी फेटाळले. येथे वाचा संपूर्ण बातमी...
सावधगिरी:घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेस आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवणार? डीके शिवकुमार यांनी स्पष्टच सांगितले
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे शनिवारी (13 मे 2023) मतमोजणी सुरू आहे. आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले की, मी आपल्या आमदारांना कुठेही घेऊन जात नाही, जोपर्यंत विधानसभा निवडणुकीचे निकाल येत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचे काम करत राहू.
गुरुवारी आणि शुक्रवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या दोन बैठका झाल्या. शुक्रवारच्या बैठकीनंतर पत्रकारांनी शिवकुमार यांना विचारले की, ते आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवत आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की नाही, सध्या ते फक्त निकालाची वाट पाहत आहेत. ते म्हणाले की आम्ही फक्त आमचे काम करत आहोत आणि आता निकालाची वाट पाहत आहोत. येथे वाचा संपूर्ण बातमी...
राजकारण:मोदी सरकारने लोकशाहीचा खून केला, कर्नाटकात 5 वर्षात भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा समोर आला; नाना पटोलेंचा घणाघात
नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केला. 5 वर्षात भाजप सरकारचे कामकाज पाहिल्यास कर्नाटक जनतेवर अत्याचार केले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे अनेक प्रश्न कर्नाटकमध्ये या 5 वर्षात निर्माण झाल्याचा घणाघात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ट्रेंडमध्ये काँग्रेसने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. सध्या काँग्रेस 128 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 77 आणि जेडीएस 17 जागांवर आघाडीवर आहे. एक जागा इतरांच्या खात्यात जात असल्याचे दिसून येत आहे. नाना पटोलेंनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.