आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Election Result 2023 Live Updates; BJP Vs Congress | Karnataka Election Viral Funny Memes | Congress

कर्नाटक निकालावर मीम्सचा पाऊस:काँग्रेस म्हणाली - 'तोड दी भ्रष्टाचार की नली'; युझर्स म्हणाले - भाजपने पाहू नये, सहन होणार नाही

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, काँग्रेसला 42.93% मते मिळाली. तर भाजपाला 36.17% व जेडीएसला 12.97% मते मिळाली. काँग्रेसच्या या दैदिप्यमान विजयावर युझर्सनी सोशल मीडियावर मजेदार मीम्स शेअर केलेत. भाजपला मोठ्या फरकाने पराभूत केल्यानंतर युजर्स म्हणाले - ही फक्त सुरुवात आहे. खाली पाहा काही निवडक मीम्स

काँग्रेसच्या धमाकेदार पुनरागमनावर युजर्सनी मीम्स शेअर करून भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले - ही फक्त सुरुवात आहे.

निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया.

भाजपच्या सध्याच्या परिस्थितीचे विनोदी पद्धतीने चित्रण करणारा हा मीम – बघू नका, सहन केले जाणार नाही.

हे मीम मतदारांप्रती काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया दर्शवते – तुम्ही तर एकदम खजिनाच उघडला आहे.

या विजयामुळे काँग्रेस कार्यालयात जल्लोषाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे या मीममधून भाजप कार्यालयाच्या दुरवस्थेचे वर्णन केले आहे - एवढी शांतता का आहे भाऊ.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचे अपडेट...

  • कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी कनकापुरा मतदारसंघातून विजय मिळवला. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शिगगावमधून आघाडीवर आहेत.
  • जेडीएस नेते कुमारस्वामी चन्नापटना मतदारसंघात आघाडीवर आहेत. हुबळी-धारवाड या पारंपरिक जागेवर जगदीश शेट्टर पिछाडीवर आहेत.
  • सिद्धरामय्या यांचा मुलगा यतिंद्र म्हणाला- माझ्या वडिलांनी मुख्यमंत्री व्हावे. तर दुसरीकडे युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास म्हणाले - ‘जय बजरंगबली, फोड दी भ्रष्टाचार की नली‘