आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसने स्पष्ट आघाडी घेतली असली तरी त्यांची भीती अजूनही संपलेली नाही. त्यामुळेच आमदारांना ठेवण्यासाठी काँग्रेसने हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक केले आहे. काँग्रेस नेते बीके हरिप्रसाद यांनी याबाबत एका न्यूज वृत्तवाहिणीशी बोलताना दुजोरा दिला. तर रिसॉर्ट बुकिंगचे कारण देखील स्पष्ट केले.
हरिप्रसाद यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधताना सांगितले की, आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून हैदराबादमध्ये एक रिसॉर्ट बुक केले आहे. कारण भाजप ऑपरेशन लोटस चालवू शकते. ते म्हणाले की, भाजपच्या एका नेत्यानेही प्लॅन बी सुरू असल्याचे सांगितले आहे. अशा स्थितीत भाजप आमदारांची तोडफोड करू शकते, ही भीती पाहता आम्ही खबरदारी करू शकतो.
राहुल गांधींचे MP सदस्यत्व रद्द होणे हा कळीचा मुद्दा
काँग्रेसच्या विजयाचे कारण स्पष्ट करताना बीके हरिप्रसाद म्हणाले की, राहुल गांधींचे सदस्यत्व हा निवडणुकीतील निर्णायक मुद्दा होता. बजरंग बली आणि बजरंग दलाच्या मुद्द्यावर बीके हरिप्रसाद म्हणाले की, कर्नाटकच्या जनतेला मूर्ख बनवता येणार नाही. कर्नाटकातील जनतेला बजरंगबली आणि बजरंग दलातील फरक माहित आहे. बजरंगबली आमचा देव आहे. लोक बजरंग दलाकडे राजकीय संघटना म्हणून पाहतात. त्यामुळेच मोठा फरक पडला नाही, मात्र, किनारी पट्ट्यात थोड्या बहुत प्रमाणात फरक पडला.
कर्नाटक निवडणूक संदर्भातील अन्य बातम्या वाचा
सिद्धरमय्या Vs डीके शिवकुमार : कर्नाटकात कॉंग्रेस विजयाकडे; जाणून घ्या- CM पदासाठी दावेदार दोन्ही नेत्यांविषयी
कर्नाटक निवडणुकीच्या निकालात कॉंग्रेस पूर्ण बहुमताने जिंकण्याच्या मार्गावर आली आहे. कॉंग्रेसचा विजय होताच मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असेल? याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या या शर्यतीत सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार टॉपवर आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल काही वेळातच स्पष्ट होणार आहेत. - येथे वाचा संपूर्ण बातमी
काँग्रेसचे संकटमोचक : कर्नाटक, गुजरातमध्ये राखली पक्षाची प्रतिष्ठा; कोण आहेत डीके शिवकुमार?
कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे राजकारणातील अनुभवी खेळाडू आहेत. 7 वेळा आमदार राहिलेले डीके शिवकुमार यांनीही कर्नाटकात मंत्रिपद भूषवलेले आहे. डीके शिवकुमार हे कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचक मानले जातात. जेव्हा-जेव्हा कर्नाटक किंवा गुजरातमध्ये कॉंग्रेस संकटात सापडली, तेव्हा डीके शिवकुमार यांनीच पक्षाला अडचणीतून बाहेर काढले. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.