आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानडी निवडणूक:कर्नाटकच्या भाजप सरकारचे 5 मंत्री पिछाडीवर, महसूल मंत्री आर अशोक यांचा कनकपुरा मतदार संघात पराभव

बंगळुरू22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकात सत्ताधारी भाजपला जोरदार झटका लागला आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत भाजपचे 5 बडे मंत्री मागे पडले आहेत. महसूल मंत्री आर अशोक यांचा कनकपुरा विधानसभा मतदार संघात दारुण पराभव झाला आहे. त्यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी पराभव केला.

दुसरीकडे, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी गृहनिर्माण मंत्री व्ही सोमन्ना यांच्यावर आघाडी घेतली आहे. वरुणा मतदार संघात या दोन्ही नेत्यांत तगडी टक्कर सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील मतमोजणीनंतर या ठिकाणी सिद्धरामय्यांनी 1224 मतांची आघाडी घेतली होती.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारचे मंत्री सोमन्ना हे ही चामराजनगर मतदार संघात पिछाडीवर पडलेत. काँग्रेस उमेदवार पुत्तरंगा शेट्टी यांनी त्यांच्यावर तब्बल 9 हजार मतांची आघाडी घेतली आहे. क्रीडा व युवा सेवा मंत्री डॉक्टर के सी नारायण गौडा यांच्यावर जेडीएस उमेदवार एच टी मंजू यांनी 3324 मतांची आघाडी घेतली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री सी सी पाटीलही मतमोजणीत पिछाडीवर पडलेत. नवलगुंड मतदार संघातील अतीतटीच्या लढतीत काँग्रेस उमेदवार बी आर यावगल यांनी त्यांना मागे टाकले आहे.

कृषीमंत्री बी सी पाटील आपले प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार यू बी बनाकर यांच्या तुलनेत मागे पडलेत. तर आरोग्य मंत्री डॉक्टर के सुधाकरही चिक्कबल्लापूर विधानसभा मतदार संघात पिछाडीवर पडलेत. या मतदार संघात काँग्रेस उमेदवार प्रदीप ईश्वर यांनी 1400 मतांची आघाडी घेतली आहे.

कर्नाटक निवडणुकीशी संबंधित खालील बातमी वाचा...

कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री?:काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज, रविवारी विधीमंडळ पक्षाची बैठक; हैदराबादेत रिसॉर्ट बुक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या गोटात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. पक्षाला मुबलक जागा मिळाल्या तर काँग्रेस विधीमंडळ पक्षाची रविवारी बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी शनिवारी सायंकाळपर्यंत विजयी उमेदवारांना राजधानी बंगळुरूला पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेत.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः कर्नाटकात तळ ठोकून आहेत. त्यांची राज्यातील घटनाक्रमावर बारकाईने नजर आहे. यावरून काँग्रेस दक्षिणेतील या महत्त्वाच्या राज्यात आपली सत्ता स्थापन करण्याची कोणतीही संधी हातातून जाऊ न देण्याच्या प्रयत्नांत असल्याचे स्पष्ट होते. येथे वाचा संपूर्ण बातमी...

गडबड गोंधळ:कर्नाटकचे CM बसवराज बोम्मई ज्या BJP उमेदवारासोबत करत होते बैठक, त्या घरात शिरला साप; माजला गोंधळ

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. त्यातच हावेरी मतदार संघातून एक विचित्र घटना घडली आहे. तिथे भाजप उमेदवार शिवराज सिंह सज्जन यांच्या निवासस्थानी साप शिरला. विशेष म्हणजे याच ठिकाणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई भाजपच्या नेत्यांसोबत बैठक करत होते. त्याचवेळी ही घटना घडल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी हा साप तत्काळ पकडून घराबाहेर काढला.

बोम्मईंना काँग्रेसच्या पठाण यांचे आव्हान

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शिगगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस उमेदवार यासीर अहमद खान पठाण यांनी त्यांना आव्हान दिले आहे. या जागेवर सर्वांची नजर आहे. सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या बोम्मई यांनी सुरुवातीच्या कलांत पठाण यांच्यावर आघाडी घेतली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...