आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटच्या मुलांप्रमाणेच दत्तक संततीसही ‘अनुकंपा’चा हक्क:कर्नाटक हायकोर्ट; भेदभाव केल्यास दत्तक घेण्याचा उद्देश अपूर्ण

बंगळुरू4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक उच्च न्यायालयाने अनुकंपा नियुक्तीशी संबंधित याचिकेत दत्तक व जैविक संततीत कोणताही फरक केला नाही. राज्य सरकारच्या मृत कर्मचाऱ्याने दत्तक घेतलेल्या मुलास अनुकंपा नियुक्त देण्याचा आदेश बजावत न्यायालय म्हणाले की, त्यालाही जैविक मुलाप्रमाणे हक्क आहे. न्या. सूरज गोविंदराज आणि बी.बसवराज यांच्या पीठाने सांगितले की, दत्तक आणि जैविकमध्ये अशा पद्धतीचा भेदभाव केल्यास दत्तक घेण्याचा कोणताही उद्देश राहणार नाही. निकालात स्पष्ट केले की, अनुकंपा नियुक्तीचा उद्देश कमावत्या सदस्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर येणारे आर्थिक संकट दूर करणे आहे. या प्रकरणात मृताने आपल्या पश्चात पत्नी, दत्तक पुत्र आणि एक मुलगी सोडली आहे. मुलगी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दिव्यांग आहे. जैविक पुत्राचे निधन झाले आहे. त्यामुळे दत्तक पुत्राला अनुकंपा नियुक्तीचा हक्क आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने अशा खटल्यात दिला नकार अलाहाबाद उच्च न्यायालयाने या वर्षी ऑगस्टमध्ये एका प्रकरणी अनुकंपा आधारावर दत्तक पुत्राच्या नियुक्तीचा दावा फेटाळला होता. आधी कुटुंबाच्या व्याख्येत दत्तक संततीचा समावेश नसल्यामुळे दावा फेटाळला. त्यानंतर अनेक दिवसांनंतर दत्तक पुत्राच्या अनुकंपा नियुक्तीची याचिका फेटाळली होती.

बातम्या आणखी आहेत...