आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka High Court Hearing Hijab Controversy Today And School Reopen Class 11th Or 12th, Udupi News

हायकोर्टात आजही हिजाबबाबत निर्णय नाही:मुस्लिम विद्यार्थिनी म्हणाल्या- हिंदू मुली बांगड्या आणि ख्रिश्चन क्रॉस घालतात, हिजाबवर सवाल का?

बंगळुरू6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील हिजाब वादावर उच्च न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान वकिलांची जोरदार उलटतपासणी झाली. अधिवक्ता कुमार यांनी खंडपीठासमोर अनेक युक्तिवाद केले, त्यापैकी एकात असे म्हटले आहे की, केवळ हिजाबचा मुद्दा उपस्थित करून सरकार हा प्रतिकूल भेदभाव का करत आहे? बांगड्या घातल्या जातात, ते धार्मिक प्रतीक नाहीत का, तुम्ही या गरीब मुस्लिम मुलींना का निवडत आहेत?

मात्र, बुधवारीही कर्नाटक उच्च न्यायालयात याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. वरिष्ठ अधिवक्ता आदिश अग्रवाल यांनी हस्तक्षेप अर्जाविषयी सांगितले, परंतु न्यायालयाने हे स्पष्ट केले की जोपर्यंत आवश्यक नसेल तोपर्यंत या प्रकरणात हस्तक्षेप केला जाणार नाही. गुरुवारी दुपारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

मंगळवारी उच्च न्यायालयात काय झाले?
कर्नाटक उच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त कामत यांनी भारतीय राज्यघटनेचे कन्नडमध्ये अधिकृत भाषांतर खंडपीठासमोर ठेवले. कामत म्हणाले की, राज्यघटनेच्या कन्नड भाषांतरात सरकारी आदेशाप्रमाणेच प्रत्येक तरतुदीमध्ये सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी हाच शब्द वापरण्यात आला आहे. त्यावर खंडपीठाने सांगितले की, आम्ही सरकारी आदेशाचा अर्थ लावत आहोत, त्यासाठी वापरलेले शब्द नाही.

या प्रकरणाची सुनावणी मार्चनंतर व्हावी, अन्यथा राजकीय पक्ष निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात, असे कामत यांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायालयाने त्यांचे म्हणणे फेटाळून लावले आणि हा विषय निवडणूक आयोगाशी संबंधित आहे, आमच्याशी संबंधित नाही.

बातम्या आणखी आहेत...