आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक हिजाब वाद:याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद- धर्मनिरपेक्ष देशातील शाळांत हिजाबवर बंदी का; SC म्हणाले- मूळ घटनेत धर्मनिरपेक्ष शब्दच नाही

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयात बुधवारी न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठासमोर कर्नाटक हिजाब वादावर दोन तासांहून अधिक काळ सुनावणी झाली. यात याचिकाकर्त्याचे वकील देवदत्त कामत यांनी बाजू मांडताना हिजाब बंदीच्या विरोधात जोरदार युक्तिवाद केला.

'लाईव्ह लॉ' च्या वृत्तानुसार, कामत म्हणाले की, केंद्रशासनाच्या केंद्रीय विद्यालयात हिजाबवर बंदी नाही, तर कर्नाटक सरकारने धर्माला लक्ष्य करण्यासाठी हिजाबवर बंदी घातली आहे.

कामत म्हणाले की, कलम 19 (वैयक्तिक स्वातंत्र्य) किंवा 25 (धर्म पाळण्याचा अधिकार) शाळेत लागू होत नाही का ? हे सर्वोच्च न्यायालयाला पहावे लागेल. आम्ही हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवू इच्छितो. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या म्हणजेच गुरूवारी होणार आहे.

सुनावणीत कोण काय म्हणाले?

न्यायमूर्ती गुप्ता: आम्ही एक पुराणमतवादी समाज आहोत, अमेरिका आणि कॅनडाच्या निर्णयांबद्दल आम्हाला सांगू नका.

वकील कामत- आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. येथे रुद्राक्ष आणि क्रॉस दोन्ही धारण करण्यास परवानगी आहे.

न्यायमूर्ती गुप्ता- संविधानाच्या गाभ्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द आहे का? तो 1976 मध्ये जोडला गेला.

अधिवक्ता कामत- मी धर्मनिरपेक्ष शब्दांवर बोलत नाही. राज्य सरकारच्या दबावामुळे शाळांमध्ये हिजाबवर बंदी घालण्यात आली होती ?

न्यायमूर्ती गुप्ता : तुम्हाला शाळांमध्ये हिजाब घालण्यास बंदी घातली आहे. त्याव्यतिरिक्त कुठेही मनाई करण्यात आलेली नाही.

अधिवक्ता कामत- कायदा आणि सुव्यवस्थेच्या किंवा नैतिकतेच्या विरोधात असताना वैयक्तिक स्वातंत्र्य रोखले जाते. मुलींचे हिजाब घालणे ना कायदा आणि सुव्यवस्थेच्या विरुद्ध आहे, ना नैतिकतेच्या.

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेले आहे

हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात 23 याचिका दाखल आहेत. मार्चमध्ये या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. 14 मार्च रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब वादावर निर्णय देताना सांगितले की, हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही. उच्च न्यायालयाने पुढे म्हटले होते की, विद्यार्थी शाळा किंवा महाविद्यालयाचा विहित गणवेश घालण्यास नकार देऊ शकत नाहीत.
उडुपीत झालेला वाद संपूर्ण कर्नाटकात पसरला
कर्नाटकातील हिजाबचा वाद जानेवारीच्या सुरुवातीला उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयात सुरू झाला. जिथे मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली होती. शाळा व्यवस्थापनाने हा गणवेश संहितेच्या विरोधात म्हटले होते. यानंतर हा वाद इतर शहरातही पसरला.

मुस्लीम तरुणी याला विरोध करत आहेत. त्याविरोधात हिंदू संघटनांशी संबंधित तरुणांनीही भगवी शाल पांघरून विरोध सुरू केला. महाविद्यालयात आंदोलनाचे हिंसक चकमकीत रूपांतर झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला होता.

बातम्या आणखी आहेत...