आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Hijab Row; Mayor Tahira Shaikh Urdu Ghar In Malegaon Named After Muskan Khan

अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा देणाऱ्या मुलीचा होणार सन्मान:मालेगावात उर्दू घराला मुस्कानचे नाव देण्याचा प्रस्ताव, महापौर म्हणाल्या- जर कोणी हिंदू असता तरीही असेच केले असते

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक हिजाब वादात अल्लाह-हू-अकबरचा नारा देऊन प्रसिद्ध झालेल्या मुस्कान खानवर मालेगावच्या महापौर ताहिरा शेख खूप प्रभावित झाल्या आहेत. मालेगावातल्या उर्दू घराला मुस्लीम मुलींचा चेहरा बनलेल्या मुस्कान खानचे नाव देण्याचा प्रस्ताव महापौर ताहिर शेख यांनी ठेवला आहे. मात्र, या निर्णयावर ताहिरा यांनी असेही म्हटले आहे की, त्यांच्या जागी कोणी हिंदू असता तरी आम्ही असेच केले असते.

शूर सिंहीणीने ज्याप्रकारे सामना केला आहे, त्याच्या बदल्यात तिला हा सन्मान द्यायचा आहे, असे महापौर म्हणाल्या.

यामुळे चर्चेत आली मुस्कान
हिजाबच्या वादावरून मंड्यातील पीईएस कॉलेजमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मुस्कानने अल्लाह हू अकबरचा नाराही दिला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हिजाबच्या वादात मुस्कान मुस्लिम मुलींचा चेहरा बनली. प्रभावित होऊन पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज हिनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवर मुस्कानचा फोटो ठेवला आहे.

मुस्कानवर बक्षिसांचा वर्षाव, मुंबईच्या आमदाराने दिला आयफोन
अल्ला हू अकबरचा जयघोष करणाऱ्या मुस्कानवर पुरस्कारांचा वर्षाव सुरू आहे. मुंबईतील वांद्रे येथील काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकीही मंड्यातील मुस्कानच्या घरी पोहोचले. तिला कर्नाटकची सिंहीण असल्याचे सांगून त्यांनी तिला एक आयफोन आणि एक स्मार्टवॉच भेट दिली. खुद्द झीशाननेही हे सोशल मीडियावर शेअर केले आहे.

9 फेब्रुवारीला जमियत उलेमा-ए-हिंदचे शिष्टमंडळही मुस्कानच्या घरी गेले होते. जिथे या लोकांनी मुस्कानच्या कुटुंबाला 5 लाख रुपये बक्षीस म्हणून दिले. मात्र, नरेंद्र मोदी विचार मंचचे राज्य सचिव मंजुनाथ यांनी जमियत उलेमा-ए-हिंदविरोधात तक्रार दाखल केली आहे. राज्यातील हिजाब वादामागे संघटनेचा हात असल्याचे मंचाचे म्हणणे आहे. या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे.

14 फेब्रुवारीला सुनावणी, अंतिम निकाल येईपर्यंत धार्मिक पोषाखांवर बंदी
हिजाबचा वाद कर्नाटक उच्च न्यायालयात आहे. मोठ्या खंडपीठाच्या सुनावणीनंतर सरन्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांनी शाळा-कॉलेज सुरू करण्याचे आदेश दिले, तसेच अंतिम निर्णय येईपर्यंत शाळा-कॉलेजमध्ये कोणीही धार्मिक पोषाख घालून आल्यास प्रवेश दिला जाणार नाही, असे सांगितले. दुसरीकडे कपिल सिब्बल यांनीही हिजाबच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...