आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Hospital Oxygen Shortage Death | 24 Patients Killed As Oxygen Shortage In Hospital, Coronavirus Outbreak In India

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 24 मृत्यू:कर्नाटकातील चामराजनगरची घटना, जीव गमावणाऱ्यांमध्ये 23 कोरोना रुग्ण; मैसूरहून योग्य वेळी झाला नाही पुरवठा

कर्नाटकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चामराजनगरमध्ये सलग ऑक्सिजन पुरवठा कठीण

कर्नाटकच्या चामराजनगर जिल्हा रुग्णालयात 24 तासांच्या आत 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 23 कोरोना संक्रमित आणि एका दुसऱ्या आजाराने पीडित रुग्णाचा समावेश आहे. असे सांगितले जात आहे की, ऑक्सिजनची कमतरता आणि इतर कारणामुळे या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त फेटाळले आहे.

चामराजनगरचे डिप्टी कमिश्नर एमआर रवी यांनी द हिंदूसोबत बोलताना म्हटले - ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ते सर्व व्हेंटिलेटरवर होते. हे रुग्ण पहिलेच गंभीर आजाराचा सामना करत होते. अशा वेळी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेच यांचा मृत्यू झाला असे म्हणणे आवश्यक नाही. मात्र सत्य परिस्थिती अशी आहे की, मैसूरमध्येही ऑक्सिजन जमा करणे कठीण झाले आहे.

चामराजनगरमध्ये सलग ऑक्सिजन पुरवठा कठीण
त्यांनी म्हटले की, पुरवठा करणारेही मैसूरच्या ऑक्सिजनची गरज पूर्ण करू शकत नाहीतेय. अशा वेळी त्यांच्यासाठी सलग चामराजनगरसाठी सप्लाय करणे अवघड होत आहे. एमआर रवी म्हणाले की, ते स्वतः ऑक्सिजनच्या स्थितीवर नजर ठेवून आहेत आणि रविवारी रात्री त्यांनी रुग्णालयाला 60 सिलेंडर दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...