आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Hubli Murder Mystery | Father Hiring Supari Killers For Son Murder | Marathi News

मुलाच्या हत्येसाठी वडिलांनीच दिली सुपारी:मुलगा दारुडा होता, खून केल्यानंतर मारेकऱ्यांनी उसाच्या शेतात पुरला मृतदेह

हुबळी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील हुबळी येथे एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मृताच्या वडिलांसह सात जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपीच्या वडिलांनी मुलाची हत्या करण्यासाठी सहा जणांना सुपारी दिल्याचे सत्य मान्य केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

काय होते संपूर्ण प्रकरण
वृत्तानुसार, 1 डिसेंबर रोजी अखिल नावाच्या 30 वर्षीय ज्वेलर्सची हत्या करण्यात आली होती. खून केल्यानंतर मारेकऱ्यांनी अखिलचा मृतदेह कालाघाटगीजवळील देवीकोप्पा येथील उसाच्या शेतात पुरला. यानंतर ३ डिसेंबर रोजी त्याच्या काकांनी केशवपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.

शेतातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार लोकांनी केली. त्यानंतर पोलिसांनी अखिलच्या कुटुंबीयांची चौकशी केली. यानंतर वडिलांनी आपला गुन्हा कबूल केला. अखिलचे वडील भरत महाजन यांनी सांगितले की, मुलगा दारू पिऊन परतला आणि पत्नीशी भांडू लागला. वडिलांनी वाद घालू नको म्हटल्याने त्याने वडिलांनाच जीवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर भरत यांनी रागाच्या भरात आपल्याच मुलाच्या हत्येसाठी 10 लाखांची सुपारी दिली.

शेतातच पोस्टमॉर्टम
वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचे हुबळीचे आयुक्त लाभू राम यांनी सांगितले. मात्र त्यांनी याबाबत अधिक काही सांगितले नाही. अखिलला सुपारी किलर्सजवळ सोडून घरी परतल्याची कबुली आरोपीने दिली आहे. तपासाअंती पोलिसांनी मृतदेह शोधून काढला. त्यानंतर कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (KIMS), फॉरेन्सिक सायन्स विंगच्या तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी पोस्टमॉर्टम केले.

वडिलांच्या माहितीनंतर मारेकरी पकडले गेले
शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सहा आरोपींमध्ये महादेव नलवाड, सलीम सलाहुद्दीन मौलवी, रेहमान विजापूर, प्रभावा हिरेमठ आणि मोहम्मद हनिफ अशी नावे आहेत. वडिलांच्या कबुलीनंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली. उर्वरित तीन आरोपींना गुरुवारी सकाळी हुबळी येथील गब्बरजवळून अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...