आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकातील म्हैसूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोक कुमार राय यांच्या भावाच्या घरातून आयकर विभागाने एक कोटी रुपये जप्त केले आहेत. अशोक कुमार पुत्तूरमधून काँग्रेसचे उमेदवार आहेत. आयकर अधिकाऱ्यांनी बुधवारी त्यांचे भाऊ सुब्रमण्यम राय यांच्या घरावर छापा टाकला. विशेष म्हणजे घराची झाडाझडती घेताना त्यांना काही मिळाले नाही. परंतू घराच्या बाहेर असलेल्या झाडावर एका पेटीत एक कोटी रुपये मिळून आले. याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
काय दिसत आहे व्हायरल व्हिडिओत...
या व्हिडिओमध्ये आयकर अधिकारी सुब्रमण्यम राय यांच्या घरी पोहोचतो आणि त्यांच्या बागेतील झाड पाहतो. यामध्ये दाट फांद्यांच्या मध्ये एक पेटी ठेवलेली दिसते. अधिकारी घरातील महिलांना विचारतात हे काय आहे? हे रोख आहे का? हे इथे कोणी ठेवले?
अधिकारी म्हणतात मॅडम आम्ही प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्या. यावर एका महिलेने उत्तर दिले की, ते मी ठेवले आहे. अधिकारी विचारतात की ते इथे ठेवायला कोणी दिले आणि काय सूचना दिल्या? यावर महिला उत्तर देण्यापूर्वीच व्हिडिओ संपतो.
कर्नाटकात अनेक आठवड्यांपासून ITचे छापे
कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे. या अंतर्गत, योग्य कागदपत्रांशिवाय मोठ्या प्रमाणात रोख एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविण्यास परवानगी नाही. त्यामुळे अवैध पैसा जप्त करण्यासाठी प्राप्तिकर विभागाचे छापे सुरू असून पोलfसही याप्रकरणी सक्रिय झाले आहेत. 13 एप्रिल रोजी बंगळुरू पोलिसांनी दोन व्यक्तींकडून 1 कोटी रुपयांची अवैध रोकड जप्त केली. सिटी मार्केट परिसरातून एका ऑटोतून ही कारवाई करण्यात आली.
काँग्रेसचे माजी नेते आणि त्यांच्या मुलाच्या घरांवर छापेमारी
गेल्या महिन्यात आयकर पथकांनी खाजगी रिअल इस्टेट डेव्हलपर अंकिता बिल्डर्सच्या कार्यालयावर आणि कंपनीचे मालक नारायण आचार्य यांच्या हुबळी येथील घरावर छापे टाकले. यापूर्वी, आयकर विभागाने माजी काँग्रेस नेते गंगाधर गौडा यांच्या दोन घरांवर आणि दक्षिण कन्नडमधील बेलथंगडी येथील एका शैक्षणिक संस्थेवर छापे टाकले होते. ही संस्था गंगाधर गौडा यांचे पुत्र रंजन गौडा यांची आहे. गंगाधर गौडा यांनी 2018 मध्ये भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कर्नाटक निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी अलीकडेच राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.