आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Jamia Masjid Row Hindu Group Demand For Video Survey, Said Right To Worship | Marathi News

कर्नाटकातील जामिया मशिदीवरून वाद:हिंदू गटाची व्हिडीओ सर्व्हेची मागणी, म्हणाले- पूजा करण्याचा अधिकार द्यावा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील जामिया मशीद हे पूर्वी मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. प्राचीन हनुमान मंदिर पाडून मशीद बांधण्यात आल्याचे विश्व हिंदू परिषदेसह (VHP) अनेक हिंदू गटांचे म्हणणे आहे. हिंदू संघटनांच्या या युक्तिवादानंतर मशिदीच्या अधिकाऱ्यांनीही सरकारकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

हिंदूंच्या चार मागण्या...

  • ज्यांनी मशिदीच्या आतील हिंदू प्रतीकांची नासधूस केली त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवावा.
  • मदरसा आणि मशिदीतील स्वयंपाक बंद करावा.
  • भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) मशिदीच्या आत व्हिडिओ सर्वेक्षण करावे.
  • हिंदूंना स्मारकाच्या आत पूजा करण्याची परवानगी द्यावी.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मशिदीत पूजा करण्याची मागणी केली.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मशिदीत पूजा करण्याची मागणी केली.

निदर्शने करणाऱ्या हिंदू गटावर कारवाई
हिंदू गटाने सांगितले होते की, ते 4 जून रोजी मशिदीमध्ये पूजा करतील. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सतर्क राहून 3 जून रोजी शहरात कलम 144 लागू केले. यानंतरही शनिवारी विहिंप आणि बजरंग दलाच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांनी जामिया मशिदीत निदर्शने केली. यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.

हिंदू म्हणाले - ज्यांनी कब्जा केला त्यांच्यावर कारवाई करावी
कार्यकर्त्यांवरील कारवाईनंतर श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुथालिक म्हणाले की, आंदोलकांना रोखणे योग्य नाही. ज्यांनी कब्जा केला त्यांना थांबवावे. येथे नमाज अदा करणाऱ्यांवर कारवाई करावी.

20 मे रोजी वाद सुरू झाला
20 मे रोजी मशिदीचा वाद सुरू झाला. ज्ञानवापी मशिदीप्रमाणे जामिया मशिदीतही सर्वेक्षण करावे, अशी मागणी करणारे निवेदन विहिंप आणि बजरंग दलाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मशिदीच्या जागेवर हनुमानाचे मंदिर होते, ते पाडून त्यावर मशीद बांधण्यात आली, असा हिंदू गटांचा दावा आहे.

बातम्या आणखी आहेत...