आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती आणि JDS चे नेते एस एल धर्मेगौडा (64) यांचा मृतदेह मंगळवारी चिकमगलूरच्या कडूर येथे रेल्वे रुळावर आढळला. सोबतच एक सुसाइड नोट देखील आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या आत्महत्याच्या अँगलने तपास करत आहेत. धर्मेगौडा यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र सुसाइड नोटमध्ये विधान परिषदेत झालेल्या गदारोळाचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेस सदस्यांनी उपसभापतींना केली होती धक्काबुक्की
15 डिसेंबर रोजी कर्नाटक विधान परिषदेत भाजपा-JDS आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. यावेळी काँग्रेसच्या सदस्यांनी धर्मेगौडा यांनाही धक्काबुक्की करत त्यांना खुर्चीवरून खाली खेचले होते. या घटनेनंतर धर्मेगौडा नाराज होते.
वृत्तसंस्थेच्या सूत्रांनुसार, गौडा सोमवारी रात्री कारमध्ये बसून फार्महाउसहून निघाले होते. पण बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्यामुळे कुटुंबीय आणि स्टाफने त्यांचा शोध घेतला. गौडा यांनी रस्त्यातच आपल्या ड्रायव्हर थांबवून कोणाशी भेटायचे असे सांगून एकटेच पुढे गेले, असे सांगितले जात आहे.
धर्मेगौडा यांच्या जाण्याने संपूर्ण राज्याचे नुकसान
धर्मेगौडा यांच्या मृतदेह आढळल्यानंतर मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांनी दुःख व्यक्त केले. माजी पंतप्रधान एची डी देवेगौडा म्हणाले की, धर्मेगौडा यांच्या जाण्याने संपूर्ण राज्याचे नुकसान झाले आहे, ते एक सज्जन नेते होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.