आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Legislative Council Session; Congress Members Pulled The Deputy Speaker Down From The Chair

कर्नाटक विधानपरिषदेत तुफान राडा:काँग्रेसच्या विधान परिषद सदस्यांनी उपसभापतींना खुर्चीवर खाली खेचले, धक्का बुक्की केली

बंगळुरू7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्नाटक विधान परिषदेत गोरक्षा कायद्यावरून काँग्रेस सदस्यांनी घातला गोंधळ

कर्नाटक विधान परिषदेत मंगळवारी गोरक्षा कायद्यावरून गदारोळ झाला. काँग्रेसच्या काही विधान परिषद आमदारांनी उपसभापती भोजेगौडांच्या खुर्चीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. या लोकांनी उपसभापतींना खुर्चीवरून खाली खेचले आणि धक्का-बुक्की केली. यानंतर काही विधान परिषद सदस्यांनी त्यांना काँग्रे MLC पासून सोडवले. यानंतर काँग्रेसच्या सर्व MLC ना सदनाच्या बाहेर काढले. या दरम्यान काँग्रेसच्या MLC नी या कायद्याविरोधात घोषणाबाजी देखील केली.

या गदारोळावर काँग्रेसचे MLC प्रकाश राठौड म्हणाले की, सभागृहाचे कामकाज चालू नव्हते. असे असूनही भाजप आणि जनता दल सेक्युलरने (जेडीएस) बेकायदेशीरपणे उपसभापतींना त्यांच्या खुर्चीवर बसवले. हे दुर्दैव आहे की भाजप अशा असंवैधानिक काम करत आहे. काँग्रेसने उपसभापतींना आसंदीतून पायउतार होण्यास सांगितले. पण ते उतरले नाहीत, त्यामुळे आम्हाला त्यांना उठवावे लागले कारण ते बेकायदेशीरपणे बसले होते.

विधान परिषदेत गोरक्षणाच्या कायद्यावर होणार होती चर्चा

कर्नाटक विधान परिषदेत 'कर्नाटक गुरेढोर कत्तल प्रतिबंध व संरक्षण विधेयक - 2020' या विधेयकावर चर्चा होणार होती. हे विधेयक 9 डिसेंबर रोजी विधानसभेत पारित झाले आहे. विधानसभेतही काँग्रेसच्या आमदारांनी या विधेयकावरून गदोरोळ घातला होता. त्यावेळी काँग्रेसच्या काही सदस्यांनी बहिष्कार देखील टाकला होता. तथापि यावर चर्चा होऊ शकली नाही.

कायद्याच्या अंमलबजावणीमुळे अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यात वाढ होऊ शकतेः काँग्रेस

कर्नाटकमधील काँग्रेस नेते म्हणाले की, राज्यात गोहत्या बंदी करणारा कायदा आणणे योग्य होणार नाही. हा कायदा आल्यानंतर अल्पसंख्यकांवरील हल्ले वाढतील. भाजप राजकीय फायद्यासाठी हा कायदा आणत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. पुढील महिन्यात राज्यात दोन टप्प्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत हा कायदा आणून भाजप भावनिक कार्ड खेळत आहे, असाही आरोप काँग्रेस नेत्यांनी केला.

कायद्यात काय आहे?

> कर्नाटकात गोहत्येवर पूर्ण बंदी आहे.

> गाईची तस्करी, अवैध मारहाण, अत्याचार आणि गोहत्या करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.

> म्हशी व त्यांच्या बछड्यांच्या संरक्षणाची तरतूद आहे.

> असे करणार्‍या आरोपींविरुद्ध त्वरित कार्यवाही करण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याचीही तरतूद आहे.

> या विधेयकात गोशाला स्थापनेची तरतूदही करण्यात आली आहे.

> पोलिस या प्रकरणाचा तपास करू शकतील.

बातम्या आणखी आहेत...