आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फोट होण्यापूर्वी हिंदू असल्याचे सांगत होता शारीक:कुकर बॉम्बने मंगळुरू उडवण्याचा होता डाव, पण स्वतःच होरपळला

बंगळुरू9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहम्मद शारीकचे हे दोन फोटो उजेडात आलेत. पहिल्या फोटोत तो कुकर बॉम्बसह दिसून येत आहे. दुसऱ्यात स्फोटानंतर रुग्णालयात उपचार घेताना दिसून येत आहे. - Divya Marathi
मोहम्मद शारीकचे हे दोन फोटो उजेडात आलेत. पहिल्या फोटोत तो कुकर बॉम्बसह दिसून येत आहे. दुसऱ्यात स्फोटानंतर रुग्णालयात उपचार घेताना दिसून येत आहे.

मंगळुरूत शनिवारी ऑटोमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी रोज नवे खुलासे होत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद शारीक कुकर बॉम्ब घेऊन ऑटोत बसला होता. त्याचे टार्गेट शहरातील वर्दळीचे ठिकाण होते. पण सुदैवाने बॉम्बचा ऑटोतच स्फोट झाला. त्यात शारीक स्वतःच जखमी झाला. तो 40 टक्के भाजला आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, शारीकने ऑटो चालकाला आपल्याला पंपवेल भागात जायचे असल्याचे सांगितले. ADGPने सांगितले की, शारीकला नगौरीतील प्लांटमध्ये स्फोट करायचा होता. पण तत्पूर्वीच बॉम्बचा स्फोट झाला. सद्यस्थितीत पोलिसांच्या निगराणीखाली ऑटो चालक व आरोपी शारीकवर उपचार सुरू आहेत.

स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज व इन्सेटमध्ये आरोपी शारीक.
स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज व इन्सेटमध्ये आरोपी शारीक.

आरोपी मोहम्मद शरीक ऑटोत एक प्रवाशी म्हणून बसला होता. त्याच्याकडे प्रेशर कुकर IED होते. त्यात स्फोट झाला. या प्रकरणी कर्नाटकचे आरोग्य मंत्री के सुधाकर यांनी सांगितले की, शारीक ऑटोमध्ये बसल्यानंतर हिंदू असल्याचे नाटक करत होता. यामागे कुणाला संशय येऊ नये अशी त्याची भावना होती. यासाठी तो एक आधार कार्डही दाखवत होता. त्यावर हिंदू नाव होते. हे कार्ड त्याने एका रेल्वे कर्मचाऱ्याकडून चोरले होते. ते पोलिसांनी परत केले.

पोलिस पुढे म्हणाले की, आम्ही या प्रकरणी सर्वच अंगांनी चौकशी करत आहोत. मोहम्मद शरीकचा आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना, प्रतिबंधित संघटना किंवा स्लीपर सेलचा सदस्य आहे काय? याचाही शोध घेतला जात आहे. आमचे राज्य केरळला चिकटून आहे. त्यामुळे तो स्लीपर सेलचा सदस्य असण्याची शक्यता वाढली आहे.

कोईम्बतूरमध्ये जाऊन स्फोट करणार होता मो. शरीक

के सुधाकर यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वीच तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये अशीच घटना घडली होती. तेव्हाही अतिरेक्यांनी मंदिराजवळ स्फोट करण्याचा कट रचला होता. मोहम्मद शरीकने तेव्हा कोईम्बतूरला जाऊन एका व्यक्तीची भेट घेतली होती. पोलिस त्याच्या मागील 2 महिन्यांतील हालचाली ट्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, शरीकने कोईम्बतूरमध्ये एक सिम कार्ड खरेदी केले होते. ते त्याच्या नावावर नव्हते. या सिम कार्डच्या टॉवरच्या लोकेशनवरून त्याने संपूर्ण तामिळनाडू पायाखाली घातल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या कॉल लॉगची तपासणी करून त्याच्या तामिळनाडूतील सहकाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.

म्हैसूरमध्ये भाड्याच्या घरात आढळली बॉम्ब बनवण्याची सामग्री

अतिरिक्त पोलिस महासंचलाक (कायदा सुव्यवस्था) आलोक कुमार यांनी सांगितले की, शरीकने आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक सक्रीय अतिरेकी संघटनेकडून प्रेरणा घेतली होती. 24 वर्षीय मोहम्मद शरीक शिवमोगा जिल्ह्यातील तीर्थनहल्लीचा रहिवासी आहे. त्याने म्हैसूरजवळ एक खोली किरायाने घेतली होती. पोलिसांनी तेथून रविवारी बॉम्ब बनवण्याची सामग्री व बोगस आयडी जप्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...