आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमोजणी:कर्नाटकातील मुस्लिमबहुल 9 पैकी 8 जागांवर काँग्रेसची आघाडी, तर एका जागेवर जेडीएस पुढे; भाजपची झुंज सुरूच

22 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
कर्नाटकमधील 20 हून अधिक मतदार संघात मुस्लिम मतदार निर्णायक भूमिका बजावतात. (प्रतिकात्मक छायाचित्र) - Divya Marathi
कर्नाटकमधील 20 हून अधिक मतदार संघात मुस्लिम मतदार निर्णायक भूमिका बजावतात. (प्रतिकात्मक छायाचित्र)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल हळूहळू स्पष्ट होत आहे. आतापर्यंतच्या कलांद्वारे सत्ताधारी भाजपचा पराभव होऊन राज्याच्या सत्तेत काँग्रेसचे पुनरागमन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकात यावेळी धार्मिक ध्रुविकरणाचा डाव खुलेआमपणे खेळण्यात आला. त्यामुळे साहजकिच सर्वांची नजर राज्यातील मुस्लिम बहुल मतदार संघांवर आहे.

कर्नाटकात मुस्लिम लोकसंख्या 13 टक्क्यांच्या आसपास आहे. राज्यातील जवळपास 20 ते 23 विधानसभा मतदार संघांत मुस्लिमांचे मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे. गत विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समुदायाचे केवळ 7 उमेदवार निवडून आले होते. ते सर्वच्या सर्व काँग्रेसचे होते. काँग्रेस व जेडीएस या दोन्ही पक्षांनी मुस्लिमांना उमेदवारी दिली. पण त्यात काँग्रेसच वरचढ ठरली.

कर्नाटकातील 9 मुस्लिम बहुल मतदार संघांतील कल पाहिले तर 8 जागांवर काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर एका जागेवर जेडीएस उमेदवार आघाडीवर आहे.

काँग्रेसचे मुस्लिम उमेदवार

चामराजपेट मतदार संघातून काँग्रेसच्या जमीर अहमद खान यांचा 53,953 मतांनी विजय झाला आहे. जमीर यांना 77,631, तर त्यांचे भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार भास्कर राव यांना 23,549 मते पडली.

हुमनाबाद मतदारसंघातून जेडीएसचे उमेदवार सीएम फयाज यांचा 1594 मतांनी पराभव झाला. या जागेवर भाजपचे सिद्धू पाटील विजयी झाले. त्यांना 74933 मते मिळाली. काँग्रेसचे राजशेखर बसवराज पाटील 73473 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

 • आसिफ सेठ - बेळगाव उत्तर
 • अब्दुल हमीद काझी साहेब मुश्रीफ - विजापूर शहर
 • कनीज फातिमा - गुलबर्गा उत्तर
 • रहीम खान - बीदर
 • इक्बाल अन्सारी - गंगावती
 • इक्बाल अहमद - तुमकूर शहर
 • रिझवान अर्शद - शिवाजीनगर
 • इक्बाल हुसेन एच. ए. - रामानगरम
 • यूटी अब्दुल खादर अल फरीद - मंगलोर
 • तनवीर सैत - नरसिंहराजा

जेडीएसचे मुस्लिम उमेदवार

 • अमानुल्ला खान - दावणगेरे दक्षिण
 • एस वाय कादरी - बसवकल्याण

कर्नाटकात मुस्लिमांचे प्रतिनिधित्व

कर्नाटक विधानसभेत गेल्या वेळी मुस्लिम समाजाचे 7 आमदार विजयी झाले होते. ते गत दशकभरातील राज्यातील सर्वात कमी मुस्लिम प्रतिनिधित्व होते. 2008 मध्ये राज्यात 9 मुस्लिम आमदार निवडून आले होते. त्यानंतर 2013 मध्ये 11 मुस्लिम उमेदवारांचा विजय झाला होता. यात काँग्रेसच्या 9 व जेडीएसच्या 2 आमदारांचा समावेश होता. सर्वाधिक मुस्लिम प्रतिनिधित्व 1978 साली होते. तेव्हा 16 मुस्लिम उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर 1983 च्या निवडणुकीत अवघे 2 मुस्लिम उमेदवार विधानसभेत पोहोचले होते.

कर्नाटक निवडणुकीशी संबंधित खालील बातम्या वाचा...

प्रतिक्रिया:राहुल गांधींनी मानले मतदारांचे आभार; म्हणाले - जनतेच्या शक्तीने भांडवलशाही ताकदींचा पराभव केला, द्वेषाचा बाजार उठला

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानंतर दुपारी 2.30 वा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते पत्रकारांना 6 वेळा नमस्कार करत कर्नाटकातील द्वेषाचा बाजार उठून प्रेमाचा बाजार भरल्याचे स्पष्ट केले. 'कर्नाटकने देशाला प्रेम पसंत असल्याचे दाखवून दिले,' असे ते म्हणाले. येथे वाचा संपूर्ण बातमी...

आनंदाश्रू:कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष DK शिवकुमार यांना अश्रू अनावर ; म्हणाले - सोनिया मला तुरुंगात भेटण्यास आल्या होत्या

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाला आहे. पण याची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. काँग्रेसच्या या विजयाबद्दल पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले - या विजयाचे श्रेय मी माझे कार्यकर्ते व पक्षाच्या नेत्यांना देतो. त्यांच्याच कष्टामुळे हा विजय मिळाला.

डी के शिवकुमार यांचा त्यांच्या कनकपुरा विधानसभा मतदार संघातून विजय झाला आहे. त्यांनी कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांचा पराभव केला. विजयाची माहिती मिळताच शिवकुमार यांनी ईश्वराचे आभार मानले. तसेच मंदिरात माथा टेकून आपल्या घराच्या बाल्कनीतून समर्थकांचे अभिवादन केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना भावना अनावर झाल्या. त्यांनी रडतच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आपल्याला भेटण्यासाठी तुरुंगात आल्याची आठवण काढली. येथे वाचा संपूर्ण बातमी...

कानडी निवडणूक:कर्नाटकच्या भाजप सरकारचे 5 मंत्री पिछाडीवर, महसूल मंत्री आर अशोक यांचा कनकपुरा मतदार संघात पराभव

कर्नाटकात सत्ताधारी भाजपला जोरदार झटका लागला आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत भाजपचे 5 बडे मंत्री मागे पडले आहेत. महसूल मंत्री आर अशोक यांचा कनकपुरा विधानसभा मतदार संघात दारुण पराभव झाला आहे. त्यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी पराभव केला.

दुसरीकडे, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी गृहनिर्माण मंत्री व्ही सोमन्ना यांच्यावर आघाडी घेतली आहे. वरुणा मतदार संघात या दोन्ही नेत्यांत तगडी टक्कर सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील मतमोजणीनंतर या ठिकाणी सिद्धरामय्यांनी 1224 मतांची आघाडी घेतली होती. येथे वाचा संपूर्ण बातमी...

कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री?:काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज, रविवारी विधीमंडळ पक्षाची बैठक; हैदराबादेत रिसॉर्ट बुक

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या गोटात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. पक्षाला मुबलक जागा मिळाल्या तर काँग्रेस विधीमंडळ पक्षाची रविवारी बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी शनिवारी सायंकाळपर्यंत विजयी उमेदवारांना राजधानी बंगळुरूला पोहोचण्याचे निर्देश देण्यात आलेत.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः कर्नाटकात तळ ठोकून आहेत. त्यांची राज्यातील घटनाक्रमावर बारकाईने नजर आहे. यावरून काँग्रेस दक्षिणेतील या महत्त्वाच्या राज्यात आपली सत्ता स्थापन करण्याची कोणतीही संधी हातातून जाऊ न देण्याच्या प्रयत्नांत असल्याचे स्पष्ट होते. येथे वाचा संपूर्ण बातमी...

गडबड गोंधळ:कर्नाटकचे CM बसवराज बोम्मई ज्या BJP उमेदवारासोबत करत होते बैठक, त्या घरात शिरला साप; माजला गोंधळ

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. त्यातच हावेरी मतदार संघातून एक विचित्र घटना घडली आहे. तिथे भाजप उमेदवार शिवराज सिंह सज्जन यांच्या निवासस्थानी साप शिरला. विशेष म्हणजे याच ठिकाणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई भाजपच्या नेत्यांसोबत बैठक करत होते. त्याचवेळी ही घटना घडल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी हा साप तत्काळ पकडून घराबाहेर काढला.

बोम्मईंना काँग्रेसच्या पठाण यांचे आव्हान

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शिगगाव विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस उमेदवार यासीर अहमद खान पठाण यांनी त्यांना आव्हान दिले आहे. या जागेवर सर्वांची नजर आहे. सलग चौथ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या बोम्मई यांनी सुरुवातीच्या कलांत पठाण यांच्यावर आघाडी घेतली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...