आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka New Chief Minister Update; BS Yediyurappa, Basavaraj Bommai, Karnataka New Chief Minister, Karnataka Politics Live Update

कर्नाटकात राजकीय हालचाली:नवीन मुख्यमंत्र्यांवर आज होऊ शकतो निर्णय; राजीनाम्याच्या शक्यतांदरम्यान येदियुरप्पा म्हणाले - संध्याकाळपर्यंत येऊ शकतो हाय कमांडचा आदेश

बंगळुरू3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंगालच्या राज्यपाल पदाची ऑफर फेटाळली

कर्नाटकमधील नेतृत्व बदलांच्या शक्यतांची चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत. आता राज्यात दलित वर्गातून मुख्यमंत्री बनवण्याची चर्चा जोरात सुरू आहे. अशी अपेक्षा आहे की आज संध्याकाळपर्यंत भाजप हाय कमांड यावर निर्णय घेऊ शकेल. दरम्यान, मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी एक मोठे विधान केले आहे. येडीयुरप्पा म्हणाले की, संध्याकाळपर्यंत हाय कमांडकडून सूचना मिळाल्या पाहिजेत अशी मला आशा आहे. याबद्दल फक्त हाय कमांड निर्णय घेईल. त्यांच्या निर्णयाबद्दल तुम्हालाही माहिती मिळेल. मला याची चिंता नाही.

हाय कमांड 26 जुलैनंतर निर्णय घेईल
येडियुरप्पा यांना पदावरून हटवण्याबाबत गेल्या अनेक आठवड्यांपासून अंदाज वर्तवले जात आहेत. या सर्व चर्चांदरम्यान ते 22 जुलै रोजी म्हणाले की त्यांना अद्याप राजीनामा देण्यास सांगण्यात आले नाही. 26 जुलै रोजी आमच्या सरकारची दोन वर्षे पूर्ण झाल्याचा कार्यक्रम आहे. यानंतर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जे काही ठरवतील त्याचे मी पालन करेल.

16 जुलै रोजी अचानक पंतप्रधान मोदींना भेटायला पोहोचले होते
यापूर्वी येडियुरप्पा 16 जुलैला दिल्लीला पोहोचले होते आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. अचानक झालेल्या बैठकीमुळे येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याविषयीच्या चर्चांना बळ मिळाले होते. यानंतर त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

येदियुरप्पांच्या राजीनाम्याच्या चर्चा का?

  • येदियुरप्पांचे वय आणि बिघडलेली तब्येत
  • कर्नाटकातील वर येत असलेले नेते आणि जुने संघी बी एल संतोष यांची येदियुरप्पांविषयी नाराजी
  • येदियुरप्पांच्या कॅम्पमध्ये सक्रिय खासदार शोभा करंदलाजे यांचे मोदी कॅबिनेमध्ये सामिल होणे

बंगालच्या राज्यपाल पदाची ऑफर फेटाळली
सूत्रांनुसार, येदियुरप्पांना पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल पदाची ऑफर आली होती. परंतु येदियुरप्पा यांनी पंतप्रधान मोदींना स्पष्टपणे सांगितले की तुम्हाला हवे असल्यास तुम्ही राजीनामा घ्या, परंतु पश्चिम बंगालमध्ये राज्यपालपद मान्य नाही. खरेतर, येदियुरप्पा हे त्यांचा मुलगा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर होईपर्यंत कर्नाटकच्या राजकारणातून निवृत्त होऊ इच्छित नाहीत.

बातम्या आणखी आहेत...