आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Next CM Candidate Announcement; BS Yediyurappa | BJP Party Kishan Reddy Dharmendra Pradhan Meeting Today In Bengaluru; News And Live Updates

बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री:बसवराज बोम्मई उद्या सकाळी 11 वाजता घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; येडियुरप्पा यांनी ठेवला होता प्रस्ताव

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येडियुरप्पा यांनी सोमवारी दिला राजीनामा

कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई हे नवीन मुख्यमंत्री होतील. ते उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. भाजप आमदारांच्या बैठकीत येडियुरप्पा यांनी बसवराज बोम्मई यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यांच्यावर नावावर सर्वच आमदारांनी सहमती दर्शवली होती.

कोण आहेत बसवराज बोम्मई?
बसवराज बोम्मई राज्याचे सध्याचे गृहमंत्री असून त्यांचा जन्म 28 जानेवारी 1960 रोजी झाला होता. त्यांचे वडील एस आर बोम्माई राज्याचे मुख्यमंत्रीदेखील राहिले आहेत. मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी करत त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती. बसवराज बोम्मई हे 1998 आणि 2004 मध्ये धारवाडमधून दोन वेळा विधानपरिषदेवर निवडून गेले आहे. त्यांनी 2008 मध्ये जनता दलला सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ते यावर्षी हावेरी जिल्ह्यातील शिगगावमधून आमदार निवडून आले आहेत.

या नावाची सुरु होती चर्चा?
येडियुरप्पा यांनी सोमवारी आपला राजीनामा राज्यपाल यांच्याकडे दिला. त्यानंतर राज्यातील राजकारण कोण मुख्यमंत्री होणार याबाबत चर्चेला उधाण आले होते. गृहमंत्री बसवराज आणि खान मंत्री एमआर निराणी नवीन मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरु आहे. कर्नाटकात विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी भाजपाने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी. के. किशन रेड्डी यांना निरीक्षक केले आहे. त्यांच्या नेतृत्वात बेंगळुरूमध्ये ही बैठक होत असून यामध्ये नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाणार आहे.

येडियुरप्पा यांनी सोमवारी दिला राजीनामा
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. यांनी सोमवारी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे राज्यात आजच या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राजीनाम्याची घोषणा करत आपण नेहमीच कठीण संकटातून गेलो असल्याचे म्हटले होते. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राजभवनात पोहोचल्यानंतर आपला राजीनामा राज्यपालांना सादर केला. राज्यपालांनीदेखील त्यांचा राजीनामा मान्य केला आहे. तथापि, नवीन मुख्यमंत्री जाहीर होईपर्यंत ते कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील.

लिंगायत समुदायावर मजबूत पकड
मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचा लिंगायत समुदायावर मजबूत पकड आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान या समाजाचे असणार आहे. गेल्या दिवशी लिंगायत समाजातील विविध मठातील 100 पेक्षा जास्त संतानी येडियुरप्पा यांची भेट घेत पाठिंबा दर्शविला होता. त्यासोबतच त्यांना पदावर काढून टाकल्यास याचे गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील असा इशारादेखील या संतानी यावेळी दिला होता.

कर्नाटकातील 100 जास्त विधानसभा जागेवर लिंगायत समाजाचा प्रभाव
कर्नाटक राज्यात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर असून 17 टक्के आहे. राज्यातील 224 विधानसभा जागेतील 90 ते 100 जांगावर लिंगायत समाजाचा प्रभाव आहे. विशेष म्हणजे राज्यातील अर्ध्यापेक्षा जास्त समुदायांवर लिंगायत समाजाचा प्रभाव आहे. यामुळे भाजपला मोठे आव्हान या समाजाचे असणार आहे.

येदियुरप्पांच्या राजीनाम्याचे तीन कारणे?

  • येदियुरप्पांचे वय आणि बिघडलेली तब्येत.
  • कर्नाटकातील वर येत असलेले नेते आणि जुने संघी बी एल संतोष यांची येदियुरप्पांविषयी नाराजी.
  • येदियुरप्पांच्या कॅम्पमध्ये सक्रिय खासदार शोभा करंदलाजे यांचे मोदी कॅबिनेमध्ये सामिल होणे.
बातम्या आणखी आहेत...