आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सतीश लक्ष्मणराव जारकीहोळी यांनी हिंदू शब्दाचा अर्थ अत्यंत घाणेरडा असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपने त्यांचे वक्तव्य हे हिंदूंचा अपमान आणि भडकावणारे असल्याचे म्हटले आहे.
रविवारी बेळगावी जिल्ह्यातील एका कार्यक्रमात ते म्हणाले की, हिंदू हा शब्द कुठून आला? हा आपला आहे का? हा शब्द पर्शियन (पर्शिया) मधील आहे. इराण, इराक, उझबेकिस्तान, कझाकिस्तान यांचा भारताशी संबंध काय? मग हिंदू हा शब्द तुमचा कसा झाला? या विषयावर चर्चा व्हायला हवी, असे ते म्हणाले. आता व्हाट्सएप आणि विकिपीडियावर हा शब्द पहा. हा शब्द तुमचा नाही. मग तुम्ही याला एवढे डोक्यावर का ठेवले आहे?
हिंदू शब्दाचा अर्थ कळला तर लाज वाटेल
हिंदू शब्दाचा अर्थ समजला तर तुम्हाला लाज वाटेल. त्याचा अर्थ अत्यंत घाणेरडा आहे. हे मी म्हणत नाही. हे आधीच वेबसाइटवर आहे. ते म्हणाले, मला समजत नाही की काही लोक या परकीय शब्दावर का गोंधळ घालत आहेत. हा परकीय शब्द आपल्यावर का लादला जातोय, यावर चर्चा व्हायला हवी. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जारकीहोळी हे कर्नाटक सरकारमध्ये माजी मंत्री राहिले आहेत.
व्होट बँकेसाठी
जारकीहोळी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने आता काँग्रेसवर निशाणा साधत याला व्होट बँकेसाठीचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, शिवराज पाटील यांच्यानंतर आता कर्नाटक काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी हिंदूंना चिथावणी दिली आहे आणि त्यांचा अपमान केला आहे. हा योगायोग नाही. हे व्होटबँकसाठी आहे. यावर प्रतिक्रिया देताना विहिंपचे नेते विनोद बन्सल म्हणाले की, काँग्रेस ही आता बुडणारी बोट आहे.
गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला
काँग्रेस नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी जिहाद केवळ इस्लाममध्येच नाही, तर भगवद् गीता व ख्रिश्चन धर्मातही असल्याचे वादग्रस्त विधान केले होते. गीतेच्या एका भागात श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवल्याचे ते म्हणाले होते. पाटील यांच्या या वादग्रस्त विधानाचा खरपूस समाचार घेत भाजप प्रवक्त्याने काँग्रेसवर मतपेटीचे राजकारण करण्याचा आरोप केला होता. येथे वाचा पुर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.