आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकच्या कलबुर्गीत पोलिसांनी नागरिकांवर चाकू हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या. फजल भगवान असे आरोपीचे नाव आहे. तो रविवारी सायंकाळी हातात चाकू घेऊन नागरिकांवर हल्ला करण्याची धमकी देत होता. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्यावरही हल्ला केला. अखेर पोलिसांनी त्यांच्यावर गोळी झाडून त्याला जखमी केले. त्यानंतर त्याला अटक केली.
पोलिसांनी या आरोपीची विस्तृत माहिती दिली नाही. पण सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. या हल्ल्यामागे त्याचा उद्देश काय होता? हे ही तपासून पाहिले जात आहे.
पोलिसांचा स्वसंरक्षणार्थ गोळीबार
या घटनेचा एक व्हिडिओही उजेडात आला आहे. त्यात दिसून येत आहे की, आरोपी फजल सुपरमार्केट हातात चाकू घेऊन नागरिकांवर हल्ला करण्याची धमकी देत आहे. लोकांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्यावरही हल्ला केला. त्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ व जनतेच्या सुरक्षेसाठी फजलवर गोळीबार केला. गोळी लागताच फजल खाली कोसळला. त्यानंतर पोलिसांनी त्याला काठीने चोप देऊन ताब्यात घेतले.
हल्ल्याचा उद्देश स्पष्ट नाही - पोलिस
एका उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीच्या हल्ल्याचा मोटिव्ह अजून स्पष्ट झाला नाही. कंट्रोल रुममध्ये आम्हाला एक फोन आला होता. त्यात एक व्यक्ती सर्वसामान्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी पोलिसांकडे मदतही मागितली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीची विस्तृत माहिती मिळू शकली नाही. डिटेल मिळाल्यानंतर त्याची माहिती माध्यमांना दिली जाईल.
अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीविरोधात हत्येच्या प्रयत्नाशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणी तपास सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.