आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक उच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात म्हटले आहे की, 5 वर्षांपर्यंत महिलेच्या संमतीने केलेल्या शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही. यासोबतच माजी प्रेयसीने तरुणावर लावलेला बलात्काराचा आरोपही न्यायालयाने फेटाळून लावला. कलम 323 आणि कलम 506 अंतर्गत खटला सुरूच राहणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
लग्न न केल्याने माजी प्रेयसीचा बलात्काराचा आरोप
बंगळुरूच्या मल्लिकार्जुन देसाईंवर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने बलात्कार आणि क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्टचा आरोप केला होता. दोघेही गेल्या 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. संबंधादरम्यान तरुणाने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, मात्र नंतर लग्नास नकार दिल्याने हा बलात्कार असल्याचे तरुणीने सांगितले.
जातीमुळे लग्न होऊ शकले नाही
मल्लिकार्जुनविरुद्ध सत्र न्यायालयात खटला सुरू झाला, त्यानंतर तो उच्च न्यायालयात पोहोचला. त्याने युक्तिवाद केला- आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत होतो आणि लग्न करायचे होते, पण जातीच्या फरकामुळे आमचे लग्न होऊ शकले नाही. आमच्यातील संबंध सहमतीचे होते, त्यामुळे याला बलात्कार म्हणता येणार नाही.
5 वर्षांसाठी संमती दिली होती, त्यामुळे हा बलात्कार नाही - उच्च न्यायालय
न्यायमूर्ती नागप्रसन्ना यांनी आपल्या निकालात म्हटले की, महिलेने शारीरिक संबंधांना एकदा, दोनदा किंवा तीनदा नव्हे तर 5 वर्षांसाठी संमती दिली होती, त्यामुळे असे म्हणता येणार नाही की, तिच्या संमतीशिवाय 5 वर्षांपर्यंत शारीरिक संबंध ठेवले गेले.
न्यायालयाने म्हटले की, या संबंधाच्या दीर्घ कालावधीमुळे, या प्रकरणात कलम 375 (बलात्काराचे कलम) लागू केले जाऊ शकत नाही आणि कलम 376 अंतर्गत शिक्षा ठोठावली जाऊ शकत नाही. यासोबतच न्यायालयाने तरुणावरील कलम 376, 376(2)(एन), 354, 406 आणि 504 अंतर्गत आरोप रद्द केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.