आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकातील शिवमोगा येथील जिल्हा रुग्णालयात नवजात अर्भकाला कुत्र्याने तोंडात धरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. कुत्रा नवजात बाळाला तोंडात धरून हॉस्पिटलमध्ये फिरत होता. रुग्णालयाच्या लेबर वॉर्डमधून बाहेर आलेल्या या कुत्र्याला पाहून लोक घाबरले. त्यांनी बाळ कुत्र्यापासून वाचवले आणि डॉक्टरांकडे नेले, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
ही घटना शनिवारी सकाळी 7 वाजताची आहे. याबाबत मॅकगन हॉस्पिटलशी बोलले असता त्यांनी सांगितले की, हे मूल येथे दाखल असलेल्या कोणत्याही महिलेचे नाही.
शवविच्छेदनानंतर नवजात बालकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल
मॅकगन जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एस. श्रीधर यांनी सांगितले की, सध्या या मुलीला जन्म देणाऱ्या आईचा शोध लागलेला नाही. या घटनेबाबत दोड्डापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बाळाचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टमनंतर मृत्यूचे कारण समजेल. त्यानंतरच अंत्यसंस्कार होणार आहेत.
व्यवस्थापनाने सांगितले - एखादी महिला सोडून गेली असावी
हॉस्पिटलने सांगितले की, बाळाचा मृत्यू दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये झाला होता. ते पॅक करून आमच्या हॉस्पिटलच्या लेबर वॉर्डच्या मागे फेकले असावे किंवा जन्मानंतर एखाद्या महिलेने बाळाला हॉस्पिटलच्या बाहेर फेकले असावे. कुत्र्याने त्याच बाळाला उचलून नेले. त्यामुळे बाळाचे आई-वडील कोण आहेत हे कळलेले नाही. शनिवारी आमच्या लेबर वॉर्डमधून एकाही बालमृत्यूची नोंद झालेली नाही.
संबंधित वृत्त
कुत्र्याने एका महिन्यांच्या बाळाला फाडून खाल्ले : राजस्थानच्या सरकारी रुग्णालयातील हृदयद्रावक घटना, मुलासह आई जमिनीवर झोपली होती
रुग्णालयात आईच्या जवळ झोपलेल्या एका महिन्यांच्या बाळाला कुत्र्याने तोंडात धरून पळ काढला. कुत्र्याने त्या निष्पाप बाळाचा पोटाचा काही भाग आणि एक हात फाडून खाल्ला. यात त्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेत आईच्या डोळ्यादेखत कुत्र्याने तिच्या बाळाचा हात ओरबडून तोडांत धरून पळ काढला. ही घटना राजस्थानमधील सिरोही सरकारी रुग्णालयात ही घटना घडली. येथे वाचा सविस्तर वृत्त
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.