आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकात शिक्षकाने केली मुलाची हत्या:चौथीच्या विद्यार्थ्याला फावड्याने मारले, नंतर शाळेच्या बाल्कनीतून ढकलले

गदग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील गदग जिल्ह्यात एका शिक्षकाने इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली, त्यानंतर शाळेच्या पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीतून ढकलून दिले. यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी शिक्षक फरार आहे.

फावड्याने मारहाण
गदग जिल्ह्याचे वरिष्ठ एसपी शिवप्रकाश देवराजू यांनी सांगितले की, हे प्रकरण हगली गावातील आदर्श प्राथमिक शाळेशी संबंधित आहे. आरोपी हा कंत्राटी शिक्षक होता. त्याचे नाव मुथप्पा असून भरत असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो 10 वर्षांचा होता.

विद्यार्थ्याच्या आईलाही मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाने विद्यार्थी भरतच्या आईलाही मारहाण केली होती, जी शाळेत शिक्षिका आहे. त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

दिल्लीतही शिक्षकाने विद्यार्थ्याला खाली फेकले

दिल्लीतील एका महिला शिक्षिकेने शुक्रवारी एका मुलीला शाळेच्या पहिल्या मजल्यावरून फेकले. मुलीवर हिंदूराव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या डोक्याला जखम झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, मॉडल बस्तीच्या प्राथमिक शाळेत इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनीला शिक्षिका गीता देशवाल यांनी कात्रीने मारले. एवढेच नाही तर तिला पहिल्या मजल्यावरून धक्का मारून फेकून दिले. प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाच्या आधारावर शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचेही जबाब उजेडात आलेत. एकाने सांगितले की, या शिक्षिकेने यापूर्वीही विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सविस्तर बातमी येथे वाचा...

बातम्या आणखी आहेत...