आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सलाम आरती’चे नाव बदलले:कर्नाटकच्या मंदिरांत आता ‘सलाम आरती’ ऐवजी असेल ‘संध्या आरती’

बंगळुरू4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातील काही मंदिरांमध्ये ३०० वर्षांपासून सुरू असलेल्या ‘सलाम आरती’चे नाव बदलण्यात आले आहे. आता ती ‘संध्या आरती’ या नावाने ओळखली जाईल. हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या संघटनांनी टिपू सुलतान यांच्या नावावर होणारे विधी संपवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीमध्ये ‘सलाम आरती’चाही समावेश आहे. कर्नाटकमध्ये मंदिरांची देखभाल करणाऱ्या स्टेट अथॉरिटी मुजरईने शनिवारी सहा महिने जुन्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. असे म्हटले जाते की, अठराव्या शतकात म्हैसूरचे शासक टिपू सुलतान यांनी या मंदिरांत आपल्या प्रवासावेळी आरतीचे नामकरण केले होते.

मेलकोटच्या ऐतिहासिक चालुवनारायण स्वामी मंदिरात १८ व्या शतकात हैदर अली व त्यांचा मुलगा टिपू सुलतान यांच्या काळापासून दररोज सायंकाळी ७ वाजता सलाम आरती (मशाल सलामी) होत आली आहे. कर्नाटक धर्मिका परिषदेचे सदस्य कशेकोडी सूर्यनारायण भट यांनी हे नाव बदलण्याची मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...